तलावाचे संग्रहीत छायाचित्र
तलावाचे संग्रहीत छायाचित्र 
मुख्य बातम्या

सांगली जिल्ह्यातील 83 तलाव कोरडे

Abhijeet Dake

सांगली ः जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू प्रकल्प 83 तलाव कोरडे पडले आहेत.

दुष्काळी तालुक्‍यातील जत, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्‍यातील चार मध्यम तलावामध्ये फक्त 2 टक्के, तर 79 लघू प्रकल्पामध्ये केवळ 14 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील सुरू असलेल्या सिंचन योजनेतून हे तलाव भरून द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र त्याकडे प्रशासन आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.

ऑगस्ट महिना संपला, तरी जिल्ह्यातील पावसाने सरासरी गाठली नाही. जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात 247.7 मिलिमीटर म्हणजे 59.2 टक्के इतका पाऊस झाला. जिल्ह्यातील असणारे तलाव कोरडे पडले आहेत. यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची टंचाई दिवसेंदिवस वाढू लागली आहे. पिण्यालाच पाणी मिळत नाही, तर शेतीला कोठून पाणी उपलब्ध करायचा, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.

दुष्काळी भागातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव, यासह मिरज तालुक्‍याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पाण्याची टंचाई दूर व्हावी, यासाठी शासनाने जिल्ह्यातील ताकारी, टेंभू, म्हैसाळ सिंचन योजना सुरू केल्या आहेत. मात्र हे पाणी मुख्य कालव्याद्वारे वाहून जाऊन लागले आहे. मुख्य कालव्याच्या परिसरातील शेतकऱ्यांना याचा फायदा होतो आहे. चार मध्यम प्रकल्पात दोनच टक्क पाणीसाठा जत, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांत 4 मध्यम तलाव आहेत. त्यामध्ये केवळ दोनच टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर जत तालुक्‍यातील संख मध्यम प्रकल्प कोरडा आहे. दोड्डानाला तलावात 2 टक्के पाणीसाठा आहे. कवठेमहांकाळ तालुक्‍यातील बसाप्पावाडी व तासगाव तालुक्‍यातील सिद्धेवाडी तलाव कोरडे आहेत. मध्यम तलावाप्रमाणे 79 लघू तलावातही केळव 14 टक्के पाणीसाठा आहे. तलाव भरण्याची गरज जिल्ह्यातील टेंभू, म्हैसाळ, ताकारी या सिंचन योजना सुरू होऊन महिना होत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेच्या माध्यमातून तलाव भरण्याची मागणी वारंवार केली आहे. मात्र अद्यापही या सिंचन योजनेच्या माध्यमातून कोरडे पडलेले तलाव भरून देण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभागाने हालचाली केलेल्या नाहीत. दुष्काळी भागातील हे तलाव या सिंचन योजनेच्या माध्यमातून भरून दिले, तर सुमारे वर्षभर पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT