इगतपुरी, जि. नाशिक : किसान सभेचा लॉंगमार्च  दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता.७) दुपारनंतर खंबाळे गावापासून शहापूरच्या दिशेने निघाला.
इगतपुरी, जि. नाशिक : किसान सभेचा लॉंगमार्च दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता.७) दुपारनंतर खंबाळे गावापासून शहापूरच्या दिशेने निघाला. 
मुख्य बातम्या

एकच तारा समोर अन् पायतळी अंगार

टीम अॅग्रोवन

इगतपुरी, जि. नाशिक (प्रतिनिधी) : किसान सभेच्या लाँगमार्चने नाशिक-मुंबई महामार्ग व्यापला आहे. राज्याच्या विविध भागांतून एकवटलेले सुमारे पंचवीस हजार शेतकरी मंगळवारी (ता.६) नाशिकमधून निघाले आहेत. रणरणत्या उन्हात ''एकच तारा समोर अन् पायतळी अंगार..गर्जा जय जयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार...या कुसुमाग्रजांच्या ओळीतील आवेश घेऊन आंदोलक चालत असल्याचे डॉ. अजित नवले यांनी सांगितले.

शेतकरी कर्जमुक्ती, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, शेतीमालाचे भाव व इतर ज्वलंत शेतकरी प्रश्नांसाठी मंगळवारी (ता.६) नाशिक येथून काढण्यात आलेला लाँगमार्च बुधवारी (ता.७) दुसऱ्या दिवशी इगतपुरी तालुक्यात दाखल झाला. दुसऱ्या दिवशी इगतपुरी तालुक्यातील शेतकरी लाँगमार्चमध्ये सामील झाल्याने नाशिक येथून सामील झालेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांचा उत्साह आणखी वाढला आहे. 

नाशिक येथून निघालेल्या लाँगमार्चचे राष्ट्रीय महामार्गावर येणाऱ्या गावांच्या वतीने ठिकठिकाणी स्वागत होत आहे. रात्री घाटनदेवी (ता. इगतपुरी) येथे लाँगमार्च मुक्काम करेल. विषेश म्हणजे महिला शेतकरीही लाँगमार्चमध्ये मोठ्या संख्येने सामील झाल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Production : वाढत्या उष्णतेचा पशुधनावर थेट परिणाम, मुदतपूर्व प्रसूतीच्या घटनांत वाढ

Climate Change : जो स्वतःला बदलेल, तोच टिकेल

River Pollution : नदी प्रदूषणाबाबत गंभीर कधी होणार?

Animal Care : दूध, आरोग्य अन् अर्थकारणावरही परिणाम

Environment Emergency : सावधपणे ऐका निसर्गाच्या हाका...

SCROLL FOR NEXT