जळगाव : पपईवर विषाणूजन्य रोग आल्याने तिचे शेंडे पिवळे पडून  वाढ खुंटत आहे.
जळगाव : पपईवर विषाणूजन्य रोग आल्याने तिचे शेंडे पिवळे पडून वाढ खुंटत आहे. 
मुख्य बातम्या

जळगावात पपईवर विषाणूजन्य रोग

Chandrakant Jadhav

जळगाव : जिल्ह्यातील पपई बागांमध्ये विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. हा ‘रिंगस्पॉट व्हायरस’ रोग असल्याचे शेतकरी सांगतात. चोपडा, जळगाव, यावलमधील पपईच्या बागा या रोगाने बाधित झाल्या आहेत. ऑगस्टमध्येच रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे झाडांची अपेक्षित वाढ झाली नाही. मार्च ते एप्रिल यादरम्यान लागवड केलेल्या पपईच्या बागांमध्ये विषाणूजन्य रोग दिसत असल्याची माहिती मिळाली आहे.

यामुळे झाडांवरील फळे निकोपपणे तयार होण्याची प्रक्रिया मंदावली असून, फळांचा आकार बेढब होऊ लागला आहे. रोगाला थोपविण्यासाठी शेतकरी उपाययोजना करीत आहेत. फवारण्या सातत्याने घ्याव्या लागत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वाढला आहे.

ऑगस्टमध्ये रिंगस्पॉटने नुकसान ऑगस्टमध्ये ‘रिंगस्पॉट व्हायरस’ हा विषाणूजन्य रोग फोफावला. त्यात फूलगळ झाली. झाडांचा रंग पिवळा, फिकट हिरवा झाला. फुले हवी तशी न लागल्याने आपसुकच त्याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे. तसेच झाडांच्या वाढीवर परिणाम झाला, असे सनपुले (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील पपई उत्पादक शेतकरी किरण पाटील यांनी सांगितले.

जळगाव जिल्ह्यात अडीच हजार हेक्‍टरवर क्षेत्र जिल्ह्यात अडीच हजार हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पपईची लागवड झाली आहे. मार्च व एप्रिलमध्ये पपईची लागवड अधिक केली जाते. या पपईमधून फळे तयार होऊन त्यांची काढणी ऑक्‍टोबरच्या अखेरीस सुरू होणे अपेक्षित होते, परंतु आता विषाणूजन्य रोगामुळे फळे तयार होण्याच्या प्रक्रियेला बाधा पोचल्याची माहिती आहे. चोपडा, यावल, रावेर, जळगाव या तालुक्‍यांमधील तापीकाठावरील गावांमध्ये अधिकची पपई लागवड झाली आहे. तसेच पाचोरा, चाळीसगाव भागांतील गिरणा नदीच्या काठावरील गावांमध्येही पपईचे पीक आहे.

सध्या जिल्हाभरातील पपईवर विषाणूजन्य रोग दिसून येत आहे. तिच्या वाढीवरही परिणाम झाला आहे. याचा फटका उत्पादनालाही बसत असून, शेतकऱ्यांना नुकसानाचा सामना करावा लागत आहे. - अनिल पाटील, पपई तज्ज्ञ, जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT