‘सकाळ-ॲग्रोवन’च्या वतीने सोलापुरात आयोजित द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनाचे उद्‌घाटन शुक्रवारी शेतकऱ्यांच्या हस्ते झाले.
‘सकाळ-ॲग्रोवन’च्या वतीने सोलापुरात आयोजित द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनाचे उद्‌घाटन शुक्रवारी शेतकऱ्यांच्या हस्ते झाले.  
मुख्य बातम्या

‘द्राक्ष-डाळिंब' प्रदर्शनाचे दिमाखात उद्‌घाटन

Sudarshan Sutaar

सोलापूर : ‘सकाळ-ॲग्रोवन’ आयोजित द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनाचे सोलापुरात आज (शुक्रवारी) दिमाखात शेतकऱ्यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शेतीतील विविध कृषी अवजारे, खते, बियाणांच्या माहितीसह नव्या तंत्रज्ञानाचा अाविष्कार पाहण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होती. सोलापुरातील होम मैदानावर सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रगतशील द्राक्ष बागायतदार दत्ता काळे (नान्नज, ता. उत्तर सोलापूर), परमेश्‍वर सूळ (कोथाळे, ता. मोहोळ), हणमंत माने (महागाव, ता. बार्शी), मल्लाप्पा जंगलगी (भंडारकवठे, ता. दक्षिण सोलापूर), चन्नप्पा ऐवळे (पानमंगरुळ, ता. अक्कलकोट), नष्टे ए. एस. (नेवरे, ता. माळशिरस) या शेतकऱ्यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले.

या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. विजय अमृतसागर, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. एल. आर. तांबडे, अँडसलाइटचे राज्याचे मुख्य वितरक प्रकाश शिंदे, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, युनिट मॅनेजर किसन दाडगे या वेळी उपस्थित होते.

उद्‌घाटनावेळी उपस्थित सर्व पाहुण्यांनी ‘ॲग्रोवन’च्या उपक्रमाचे कौतुक केले. जिल्हास्तरावर अशा प्रदर्शनांची गरज आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रदर्शनातील नव्या तंत्रज्ञानाची, मान्यरांच्या तज्ज्ञांच्या व्याख्यानांचा लाभ घ्यावा, असे आवाहन या वेळी केले.

ट्रॅक्‍टर, ब्लोअर, ड्रीप इरिगेशन, कीडनाशके, वनस्पती वाढनियंत्रके यांच्यासह विविध कृषी उत्पादने, वस्तू आदींचा समावेश असणारे हे प्रदर्शन येत्या रविवारपर्यंत (ता.१७) चालणार आहे.

पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद प्रदर्शनाचे उद्‌घाटन सकाळी साडेअकरा वाजता होते; पण तत्पूर्वीच शेतकऱ्यांनी प्रदर्शनस्थळी गर्दी केली होती. प्रत्येक स्टॉलवर शेतकरी माहितीपत्रक घेण्यासह त्यांना असलेल्या शंका विचारत होते. शेतकरी ते उत्पादक कंपन्यांशी थेट संवाद होत होता. शेतकऱ्यांबरोबर अनेक शेतकरी पती-पत्नींचाही सहभाग यामध्ये होता. पहिल्या दिवशी प्रगतशील शेतकरी मारुती चव्हाण यांचे ‘द्राक्ष उत्पादनासाठी ऑक्‍टोबर छाटणीनंतरचे नियोजन’ या विषयावर व्याख्यान झाले; तर दुपारच्या सत्रात डाळिंबावर राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ज्योत्स्ना शर्मा यांचे ‘डाळिंबावरील कीड-रोग समस्या’ यावर मार्गदर्शन झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT