एक जूनच्या संपात शेतकऱ्यांनी सहभागी होऊ नये : दाभाडे
एक जूनच्या संपात शेतकऱ्यांनी सहभागी होऊ नये : दाभाडे  
मुख्य बातम्या

एक जूनच्या संपात शेतकऱ्यांनी सहभागी होऊ नये : दाभाडे

टीम अॅग्रोवन

अकोला : एक जूनपासून घोषित संपात सुकाणू समिती सहभागी होणार नसून विदर्भातील शेतकऱ्यांनी सहभागी होऊ नये, असे अावाहन शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दिनकर दाभाडे यांनी केले अाहे. ९ अाॅगस्ट रोजी एल्गार परिषद अायोजित करण्यात अाली असल्याचे त्यांनी सांगितले. 

अौरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत वर्षभरातील सुकाणू आंदोलनाचा आढावा घेण्यात आला. १२ जून रोजी मुंबई येथे मंत्रालयावर पाकिस्तानची साखर, इतर आयात केलेल्या धोरणांचा निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. तर सुकाणू समितीच्या सर्व संघटनाच्या पदाधिकाऱ्यांचे शेतकरी प्रश्न-शेतकरी धोरण, कर्जमुक्ती लढा अभ्यास शिबिर २७ व २७ जूनला अंबाजोगाई येथे घेण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, गावपातळीवर थेट कर्जपुरवठा विविध कार्यकारी सोसायटयामार्फत शेतकऱ्यांना झाला पाहिजे. नाबार्डने थेट कर्ज विविध कार्यकारी सोसायट्यांना दयावे, राज्यभरातील २१ हजार सोसायट्या मजबूत करा, शेतकरी वाचवा- विकास सहकारी सोसायट्या वाचवा, या विषयी विभागवार शेतकरी-विकास सोसायटी संचालक परिषदा आयोजित करण्यात येणार आहेत, असेही श्री. दाभाडे यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT