परभणी ः खरीप विमा परतावा प्रश्नावर भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी (ता. ९) शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. (छायाचित्र ः योगेश गौतम)
परभणी ः खरीप विमा परतावा प्रश्नावर भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी (ता. ९) शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. (छायाचित्र ः योगेश गौतम) 
मुख्य बातम्या

खरीप पीकविमाप्रश्नी शेतकरी आक्रमक

टीम अॅग्रोवन

परभणी  ः अत्यंत तुटपुंजा खरीप विमा परतावा मंजूर करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विमा कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा. सोयाबीनचा विमा हप्ता भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण जोखमीसह प्रतिहेक्टरी ४० हजार रुपये विमा परतावा देण्यात यावी. बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ अनुदान देण्यात यावे, या मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासह शेतकरी संघर्ष समितीतर्फे सोमवारी (ता. ९) शनिवार बाजार मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

अल्प आणि अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील खरिपातील सर्वच पिकांच्या उत्पादनात घट आल्यामुळे जिल्ह्याची खरिपाची अंतिम पैसेवारी ५० पैसे पेक्षा कमी आली आहे. खरीप पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांना सर्व पिकांसाठी संपूर्ण जोखमीसह विमा परतावा मंजूर करणे अपेक्षित असताना रिलायन्स कंपनीने अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा हप्त्याएवढीही रक्कम जमा केलेली नाही. पीकविमा संरक्षण घेऊनही अल्प विमापरतावा मिळाल्यामुळे शेतकरी अडचणी सापडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी विमा कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.  

जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्वर धरणाचे संरक्षण करण्यात यावे, डिग्रस बंधाऱ्यामध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा उपलब्ध करून द्यावा, सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा, नवीन कर्जवाटप सुरू करण्यात यावे, शेतीपंपांना मोफत वीज देण्यात यावी, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.  भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारणी सदस्य राजन क्षीरसागर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष माणिक कदम, नामदेव गावडे, अॅड. लक्ष्मण काळे, अॅड. माधुरी क्षीरसागर, शिवाजी कदम, केशव आरमळ, नवनाथ कोल्हे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT