विनाअट कर्जमंजुरी पत्र सादर करण्यास १३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
विनाअट कर्जमंजुरी पत्र सादर करण्यास १३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ 
मुख्य बातम्या

विनाअट कर्जमंजुरी पत्र सादर करण्यास १३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

कोजेन्सिस वृत्तसेवा

परभणी : जलसमृद्धी यंत्रसामग्री (अर्थमूव्हर्स) व्याज अर्थसहाय्य योजनेंतर्गत पात्र अर्जदारांना अर्थसाहाय्यासाठी आवश्यक बॅंकेकडून विनाअट कर्जमंजुरीचे पत्र सादर करण्यासाठी १३ एप्रिलपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) गणेश पुरी यांनी या संदर्भात माहिती दिली.

यापूर्वी हे पत्र सादर करण्यासाठी २३ मार्चपर्यंतची अंतिम मुदत होती. परंतु अनेक बँकांनी असे पत्र देण्यास नकार दिला. त्यामुळे इच्छुक पात्र अर्जदार या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन हे पत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबतचे वृत्त २३ मार्च रोजी ''अॅग्रोवन''च्या अंकात प्रसिद्ध करण्यात आले होते.

या वृत्ताची दखल घेत संबंधीत विभागाने पात्र अर्जदारांना विनाअट कर्जमंजुरीबाबतचे पत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी शासनाकडे केली. यापूर्वी दिलेल्या २३ मार्चपर्यंतच्या विहित मुदतीत विनाअट कर्जमंजुरीचे पत्र सादर करणाऱ्या अर्जदारांची संख्या अत्यंत कमी असल्यामुळे मुदतवाढीची मागणी करण्यात आली. त्यानुसार आता सर्व पात्र अर्जदारांना विनाअट कर्जमंजुरीचे पत्र १३ एपिलपर्यंत दिलेल्या वाढीव मुदतीत सादर करता येणार आहे.

या संदर्भातील सूचना शनिवारी (ता. ३१) जिल्हा उपनिबंधक कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. मुदतवाढीसंदर्भात महाआॅनलाइनसोबत आवश्यक पत्रव्यवहार तसेच सूचना देण्यास्तव कळविण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने जलसमृद्धी यंत्रसामग्री व्याज अर्थसहाय्य योजनेअंतर्गत सुशिक्षित बेरोजगार युवक व शेतकऱ्यांना अर्थमूव्हर्स (पोकलेन मशिन) खरेदीसाठी वित्तीय संस्थांकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या १७ लाख ६० रुपये कर्जावरील व्याज शासन भरणार आहे. या योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यातून ४० लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट आहे. ४१७ अर्जदार पात्र ठरले आहेत. यापूर्वी पात्र अर्जदारांनी विहित मुदतीत अयोग्य कर्जमंजुरीचे पत्र सादर केलेल्या अर्जदारांसह आता सर्व अर्जदारांनी १३ एप्रिल पर्यंत दिलेल्या वाढीव मुदतीत विनाअट कर्जमंजुरीचे पत्र आपल्या Log in ID द्वारे आॅनलाइन सादर करायचे आहे.

याबाबत राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीच्या मुख्य व्यवस्थापकांनादेखील कळविण्यात आले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Stamp Duty : सातारा जिल्ह्यात पीककर्जासाठी ‘मुद्रांक शुल्क’ माफ

Onion Market : कांदा दरात घसरणीने उत्पादक अडचणीत

Water Scarcity : लोणी भापकर योजनेमुळे आठ गावे अन् ७८ वाड्या होणार टंचाईमुक्त

Co-operative Society : विकास सेवा सोसायट्यांवर आता ‘सीसीटीव्ही’चा ‘वॉच’

Silver Rate : चांदी दरात १४०० रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT