औरंगाबादला आजपासून ‘अॅग्रोवन’ कृषी ज्ञानसोहळा
औरंगाबादला आजपासून ‘अॅग्रोवन’ कृषी ज्ञानसोहळा  
मुख्य बातम्या

औरंगाबादला आजपासून 'ॲग्रोवन’ कृषी ज्ञानसोहळा

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : राज्यभरातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे तंत्र व प्रयोगशील कृषी व्यवस्थेची विविधांगी पद्धतीने गाथा सांगणारे ‘सकाळ अॅग्रोवन’चे कृषी प्रदर्शन आजपासून (ता. २७) औरंगाबादमध्ये सुरू होत आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्या प्रमुख उपस्थितीत शानदार उद्‌घाटन होत असलेला हा प्रदर्शनरूपी कृषी ज्ञानसोहळा चार दिवस सुरू राहील.   औरंगाबादच्या बीड बायपासजवळील जबिंदा ग्राउंडवर भरणाऱ्या या प्रदर्शनाविषयी मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. प्रदर्शनाचा मुख्य उद्‌घघाटन सोहळा ग्रामविकासमंत्री तसेच कुलगुरू डॉ. ढवण यांच्या उपस्थितीत आज दुपारी साडेचार वाजता होत असला तरी सकाळी ११ वाजल्यापासूनच प्रदर्शनाला प्रवेश खुला होईल.  नामांकित कृषी संशोधन संस्थांसह या प्रदर्शनात शासनाचे विविध विभाग, बॅंका, कृषी शिक्षण संस्था, बियाणे, खते, कीटकनाशके, औजारे क्षेत्रातील कंपन्या तसेच ट्रॅक्टर, हार्वेस्टिंग यंत्रे, कापणी यंत्रे, प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग, ड्रीप, टिश्यू कल्चर क्षेत्रातील नामवंत कंपन्या सहभागी होत आहेत. त्याचबरोबर ऑटोमोबाईल्स, डेअरी, पशुसंवर्धन, पशुखाद्य, नर्सरी, कृषी प्रकाशने, अपारंपरिक ऊर्जा साधनांचे स्टॉल्स असतील. दुष्काळाशी सामना करीत आदर्श शेती, शेती पूरक व्यवसाय व विविध प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांची माहितीदेखील या वेळी मिळणार आहे. त्यामुळे प्रदर्शनातून एक नवी उमेद देण्याचा प्रयत्न अॅग्रोवन करीत आहे. प्रदर्शनासाठी सर्व दिवस विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे.  देशाच्या पशुसंवर्धन क्षेत्रात एक आश्चर्य समजले जाणारा एक टन वजनाचा बैलदेखील शेतकऱ्यांचे आकर्षण ठरणार आहे. एक हजार किलो वजन, सहा फूट उंची आणि दहा फूट लांबीचा हा बैल या प्रदर्शनात सशुल्क बघता येईल.  असे या अॅग्रोवन कृषी प्रदर्शनाला... Video आज रोटाव्हेटर जिंकण्याची संधी अॅग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना दर्जेदार माहिती बरोबरच प्रत्यक्ष बक्षिसांचीही मेजवानी मिळते. प्रदर्शनासाठीची प्रवेशिका भरणाऱ्या शेतकऱ्यांना अॅन्डस्लाईट कंपनीकडून चारही दिवस दरतासाला बॅटरी जिंकण्याची संधी मिळणार आहे. तसेच रोहित स्टील कंपनीकडून रोटाव्हेटर जिंकण्याची संधीही आज भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे.

शेतकऱ्यांच्या मुलांनी बनविलेले फवारणी यंत्र पाहण्यास विसरु नका... video

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

SCROLL FOR NEXT