पणन मंडळाच्या निर्यात सुविधा केंद्रांमुळे रोजगार
पणन मंडळाच्या निर्यात सुविधा केंद्रांमुळे रोजगार  
मुख्य बातम्या

पणन मंडळाच्या निर्यात सुविधा केंद्रांमुळे रोजगार

टीम अॅग्रोवन

पुणे : महाराष्ट्र कृषी पणन मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या विविध निर्यात सुविधा केंद्रांमधून गेल्या तीन महिन्यांत शेतमाल निर्यातीबराेबर स्थानिकांना राेजगार उपलब्ध झाला आहे. विविध कारणांनी निर्यात सुविधा केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नव्हती. मात्र आता खासगी निर्यातदारांना सर्व केंद्रांवरील सुविधा पूर्ण क्षमतेने उपलब्ध करून दिल्याने शेतमाल निर्यातीस गती मिळाली आहे. गेल्या तीन महिन्यांत ७९६ मेट्रिक टन शेतमालाची निर्यात झाली आहे; तर २ हजार स्थानिक बेराेजगारांना राेजगार उपलब्ध झाला आहे. 

पणन मंडळाच्या वतीने राज्याच्या विविध भागांत ४४ निर्यात सुविधा केंद्रे उभारण्यात आली आहेत. यामध्ये शीतगृहे, प्रशितकरण, रायपनिंग चेंबर आदी सुविधांचा समावेश आहे. या विविध सुविधा केंद्रांद्वारे द्राक्षे, गुलाब, डाळिंब, मसाले पदार्थ, आंबा, पल्प, भेंडी, कारले, शेवगा, ताेंडली, मिरची आदी विविध शेतमालाची निर्यात केली जाते. ही सुविधा केंद्रांद्वारे अधिक शेतमाल निर्यात व्हावा, यासाठी यांचा उपयाेग पीपीपी तत्त्वावर करण्यात यावा, अशा सूचना पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी पणन मंडळाला दिल्या हाेत्या. त्यानुसार गेल्या तीन महिन्यांत विविध खासगी निर्यातदारांनी या सुविधांचा उपयाेग करून, सुमारे २ काेटी रुपयांचा ७९६ टन शेतमालाची निर्यात केली आहे; तर या माध्यमातून स्थानिक २ हजार बेराेजगारांना राेजगार संधीदेखील उपलब्ध झाली आहे, अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

Natural Disaster in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरवर निसर्ग कोपला; अतिवृष्टी, भूस्खलनानंतर भूकंपाचे धक्के

Kadavanchi Watershed Project : कडवंची ‘वॉटर बजेट’द्वारे समृद्धी

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

SCROLL FOR NEXT