औरवाड, जि. कोल्हापूर : रहदारीच्या रस्त्यावरही मालकाविना चारा वाहणारा ‘राज’. (छायाचित्र ः सुुरेश मेंगे, शेडशाळ)
औरवाड, जि. कोल्हापूर : रहदारीच्या रस्त्यावरही मालकाविना चारा वाहणारा ‘राज’. (छायाचित्र ः सुुरेश मेंगे, शेडशाळ)  
मुख्य बातम्या

...जीव लावलाय मालकावरी

Raj Chougule

कोल्हापूर : ‘गेली सांगून ज्ञानेश्‍वरी, माणसापरीस मेंढरं बरी’ या गाण्याचे बोल ऐकले की मुक्‍या जनावरांच्या प्रामाणिकपणाचे चित्र उभे राहाते. या गाण्यातील ‘काय बोलत नाय, काय मागत नाय, जीव लावतंय मालकावरी’ या ओळी नक्कीच अंतर्मुख करणाऱ्या आहेत. अगदी या ओळी चपखल बसतील असा प्रामाणिकपणा आणि शिस्त औरवाडमधील एका ‘राज’ नावाच्या बैलाने जपली आहे. सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शेतातून मालक नसतानाही चाऱ्याने भरलेली गाडी घरी आणण्याचे काम हा बैल गेल्या वर्षभरापासून नित्यनियमाने करीत आहे.

वैरण गाडीत भरली आणि त्याला निघण्याचा इशारा केला, की तो रस्त्याच्या एका बाजूने मार्गाक्रमण करण्यास सुरवात करतो. रहदारीचा रस्ता असला तरी इतर कोणत्याही वाहनाला अडचण न करता आपल्या ठरलेल्या मार्गाने हा बैल भरलेली वैरण धन्याच्या घरात सुखरूप पोच करतो. तेव्हा धन्याच्या चेहऱ्यावरही एक वेगळे समाधान पसरते. आजच्या युगात मनुष्यावरही विश्‍वास ठेवणे कठीण बनत असताना या बैलाची निरपेक्ष सेवा परिसरात चांगलीच चर्चेची ठरली आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांना विश्‍वास बसणार नाही, अशा पद्धतीने बैलाचे चाललेले काम थक्क करून जाते.  श्रीक्षेत्र नृसिंहवाडीपासून केवळ एक किलोमीटर अंतरावर असणारे औरवाड हे गाव. नृसिंहवाडी आणि औरवाडमध्ये फक्त नदीचेच अंतर आहे. या गावचे सरपंच अश्रफ पटेल यांची औरवाडमध्ये एकत्रित शेती आहे. यामुळे त्यांना दररोज जनावरांसाठी चारा आणावा लागतो. हे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. या अगोदरही त्यांची बैलजोडी होती. त्या बैलजोडीबरोबर हा बैलही जायचाच. कालांतराने ते बैल विकल्यानंतर याला जुंपण्यात आले. एक दोन वेळा गाडीच्या मागे चालत जाऊन बैल जातोय की नाही याचा प्रयोग करण्यात आला. तो यशस्वी झाल्यानंतर वैरण भरलेल्या गाडीबरोबर कुणीही जात नाही.

अनोखी पद्धत पटेल कुटुंबीयांची शेती विविध ठिकाणी आहे. जर घरातून बैल जुंपून त्याला जाण्याचा इशारा केला, की मोकळी गाडी घेऊन बैल मळीच्या शेतात जातो आणि वैरण भरली की परत घरी येतो. इतर ठिकाणीही पटेल कुटुंबीयांची शेती आहे. मळी सोडून इतर ठिकाणची वैरण आणायची झाल्यास त्याच्या बरोबर एखादी व्यक्ती जाते. तिथे वैरण भररल्यांनतर मात्र पुन्हा हा बैल एकटा घराकडे येतो. कोणत्याही शेतातून हा बैल एकटा वैरण घेऊन येतो. 

आज प्रामाणिकपणा, निष्ठा याबाबी कमी होत आहेत. पण निष्ठेने कसे काम करायचे हे शिकायचे असेल तर आमचा ‘राज’ याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. जनावरांकडूनही काही बाबी शिकण्यासारख्या असतात. हा बैल आमची प्रेरणा आहे.  - अश्रफ पटेल,  सरपंच, औरवाड, जि. कोल्हापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT