संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

पोटनिवडणुकीसाठी आज ठरणार भाजपचा उमेदवार

टीम अॅग्रोवन

भंडारा  ः लोकसभेची पोटनिवडणूक येत्या २८ मे रोजी होत आहे. त्याकरिता भाजपच्या वतीने पूर्ण तयारी झाली असून, सोमवारी (ता. ७) पक्षाचा उमेदवार जाहीर होईल, अशी माहिती ऊर्जामंत्री तसेच भंडाऱ्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

बावनकुळे म्हणाले, प्रशासकीय अनुभव असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देण्याचे धोरण ठरविले आहे. त्याचा शोध अंतिम टप्प्यात असून, सात मे रोजी त्याविषयीची अधिकृत घोषणा होईल. त्यानंतर ९ मे रोजी भाजपचा उमेदवार नामांकन अर्ज दाखल करणार आहे.

भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन सभा होतील. पालकमंत्री या नात्याने भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात ५० सभा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी खासदार नाना पटोले यांनी दिलेला राजीनामा हा दुर्देवी आहे. मागील साडेतीन वर्षांत विकासाचे कोणतेही काम त्यांनी केले नाही. याउलट राजीनामा देऊन जनतेचा विश्‍वासघात केला. 

शिवसेनेशी युतीचा निर्णय पक्षश्रेष्ठींचा पोटनिवडणुकीत शिवसेनेशी युतीचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. त्या पातळीवर तशी चर्चा सुरू असून, अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्ष घेतील, अशी माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT