सांगली जिल्ह्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांची ६० टक्के पदे रिक्त
सांगली जिल्ह्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांची ६० टक्के पदे रिक्त 
मुख्य बातम्या

सांगली जिल्ह्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांची ६० टक्के पदे रिक्त

टीम अॅग्रोवन

सांगली  ः जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडे जिल्ह्यात १०२ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. त्यातील ७६ दवाखाने श्रेणी-१ चे आहेत. मात्र पशुसंवर्धन विभागाला डॉक्‍टरांच्या (पशुधन विकास अधिकारी) रिक्त पदांचा प्रश्‍न गेली दहा-बारा वर्षे सतावत असून, पशुवैद्यकीय विभागातील डॉक्‍टरांची जवळपास ६० टक्के पदे रिक्त आहेत. पशुवैद्यकीय दवाखान्यांचा कारभार पशुधन विकास अधिकाऱ्यांऐवजी पशुधन पर्यवेक्षकांच्या प्रभारी कार्यभारावर सुरू आहे. नवीन नियुक्तीत अवघे २ डॉक्‍टर पशुसंवर्धनला मिळाले आहेत.

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामध्ये अनेक वर्षांपासून रिक्त पदे भरण्यासाठी कोणत्याही हालचाली शासनाने केलेल्या दिसत नाहीत. रिक्त पदे तातडीने भरावीत, यासाठी जिल्हा परिषदेने अनेक ठरावदेखील केले आहेत. मात्र, ते केवळ कागदावरच राहिले आहेत. सांगली जिल्हा परिषदेकडे २ आणि जिल्ह्यात स्टेट पशुसंवर्धनच्या दवाखान्यांकडे २ पशुधन विकास अधिकारी नियुक्त केले आहेत. नवीन नियुक्तीद्वारे जिल्हा परिषदेच्या कडेगाव, शासनाकडील दूधगाव पशुवैद्यकीय दवाखान्याकडे आणि तासगाव पशुचिकित्सालयाला नवीन डॉक्‍टरांनी नेमणूक झाली आहे. मात्र, या ठिकाणी डॉक्‍टर हजर झाले नाहीत. त्यामुळे प्रभारी डॉक्‍टर काम पाहात आहेत. मात्र, काही ठिकाणी पशुधन पर्यवेक्षकांमार्फत प्रभारी कामकाज सुरू असल्याने पशुपालकांना योग्य सेवा मिळत नसल्याचे चित्र आहे.

कडेगाव, शिराळा, कवठेमहांकाळ, जत तालुका रिक्त जत तालुक्‍यात श्रेणी-१चे १५, श्रेणी-२चे ९ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. पशुधन विकास अधिकाऱ्यांची १५ पदे मंजूर आहेत़ पण केवळ ४ पदे कार्यरत होती. दोन दिवसांपूर्वी नवीन नियुक्तीतील डॉ. देशमुख उमदीला रुजू झाल्याने कार्यरत पदांची संख्या  ५ झाली असून, रिक्त पदे १० आहेत. कडेगाव, शिराळा, कवठेमहांकाळ, जत या तालुक्‍यांत पशुधन विकास अधिकाऱ्यांची रिक्त पदे मोठ्या प्रमाणावर आहेत.  पशुधन विकास अधिकाऱ्यांची तालुकानिहाय कार्यरत पदे (कंसात रिक्त पदे) : कडेगाव- ० (८), कवठेमहांकाळ- १ (५), जत- ५ (१०), शिराळा- ४ (११), मिरज- ७ (२), खानापूर- ४ (५), आटपाडी- ५ (२), तासगाव- ३ (१), पलूस- २ (२), वाळवा- ६ (३). जिल्हा परिषद मुख्यालयासाठी पशुधन विकास अधिकाऱ्यांचे एक पद मंजूर असून ते कार्यरत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : विदर्भात पावसाचा अंदाज; पावसासोबतच राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका कायम

Fodder News : विक्रीसाठी चारा उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करा; पशुसंवर्धन आयुक्तांचे आदेश

Agriculture Land : नसलेल्या जमिनीचा शोध!

Crop Management : जमीन, पाऊसमानानुसार करा कोरडवाहू पिकाचं नियोजन

Watermelon Cultivation : प्रयोगशीलता जपत केली खरबूज लागवड

SCROLL FOR NEXT