संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

कीडनाशकांच्या अनियंत्रित वापरामुळे पक्ष्यांच्या २५ प्रजाती नामशेष

सकाळ वृत्तसेवा

नागपूर  ः शेतीतील पिकांवर फवारण्यात येणाऱ्या रासायनिक कीडनाशकांचा अनियंत्रित वापर पक्ष्यांच्या जीवावर उठला आहे. यामुळे अलीकडच्या दशकात अंदाजे २५ पक्षी प्रजाती नामशेष झाल्या आहेत. हा आलेख वेगाने चढतो आहे. लुप्तप्राय होण्याच्या दिशेने सरकणाऱ्या पक्षी प्रजाती आता अतिशय धोकादायक श्रेणीत गेल्या आहेत. यामध्ये रेड बिल्ड कुरासो क्रॅक्‍स, गुलाबी कबूतर नेसोनस मायेरी, ब्लॅक फेस स्पूनबिल प्लॅटेलिया मायनर या प्रमुख पक्ष्यांचा समावेश आहे. 

जगभरातील पक्ष्यांच्या आरोग्याचा अभ्यास करणाऱ्या बर्ड लाइफ इंटरनॅशनलच्या नवीन अहवालाने पक्षिप्रेमींसोबतच संशोधकांचीही झोप उडवून टाकली आहे. याला कारणही तसेच आहे. जगभरातील ११ हजार पक्षी प्रजातींपैकी ४० टक्के प्रजाती वेगाने नष्ट होत आहे. आठ पक्षी प्रजातींपैकी एक जागतिक पातळीवर नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे. ही आकडेवारी धोक्‍याची पातळी दर्शवणारी आहे. 

‘स्टेट्‌स ऑफ द वर्ल्डस बर्डस’ या अहवालात जगभरातील प्रसिद्ध पक्षी प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. यात बर्फाच्छादित घुबड बुबो स्कॅंडिकस, युरोपियन टर्टल डव्ह स्ट्रेप्टोपेलिया टर्टूर हे पक्षी जागतिक स्तरावर नष्ट झाल्याचे नमूद केले आहे. पृथ्वीच्या एकूण वातावरणाचा विचार करून जगभरातील पक्ष्यांच्या आरोग्याचे मूल्यांकन करण्यात आले. पक्षी प्रजातीच्या आरोग्यावरून पर्यावरणीय आरोग्याचा अंदाज येतो. शेतीचा विस्तार आणि त्या विस्ताराच्या तीव्रतेचा सुमारे ७० टक्के परिणाम जागतिक पातळीवर धोक्‍यात असलेल्या पक्ष्यांवर पडतो. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

Sugar Commissionerate : साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली

Loksabha Election 2024 : खडकवासला मतदार संघातील मतदान केंद्रांना साहित्याचे वितरण

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

Banana Rate : खानदेशात केळी दरात मोठी घसरण

SCROLL FOR NEXT