दुष्काळ
दुष्काळ  
मुख्य बातम्या

आंध्रात दुष्काळाचा शेतीला फटका

कोजेन्सिस वृत्तसेवा

मुंबई: आंध्र प्रदेशात दुष्काळी स्थिती असल्याने त्याचा परिणाम शेती पिकांच्या उत्पादनावर झाला आहे. राज्यात दुष्काळ घोषित झाला असून, परिणामी अनेक पिकांच्या उत्पादवर दुष्काळाचा परिणाम झाला आहे, अशी माहिती आंध्र प्रदेश कृषी विभागाने दिली आहे. आंध्र प्रदेशात २०१८-१९ च्या मॉन्सून हंगामात सरासरीच्या १२ टक्के कमी पाऊस झाला आहे. येथे ४४३.१ मिलिमीटर पाऊस झाला. राज्यातील अनंतपूर जिल्ह्यातील सर्वच गावांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. तसेच कडापा, चीतौर, प्रकासम आणि नेल्लोर जिल्ह्यातील अनेक भागांत कमी पाऊस झाला आहे. आंध्र प्रदेशबरोबरच आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, झारखंड, ओडिशा आणि राजस्थान या राज्यांनी दुष्काळ जाहीर केला आहे.     कृषी विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात २०१८-१९ च्या हंगामात मका पिकाच्या उत्पादनात तब्बल २८ टक्के घट होऊन १६.७ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. येथील मका उत्पादकतेत २०१७-१८ च्या हेक्टरी ६८५१ किलोच्या तुलनेत यंदा ६२७५ किलो झाली आहे. तसेच राज्यात मका पिकावर मोठ्या प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळेही मका उत्पादनात घट आली आहे.  आंध्र प्रदेशात उत्पादकता घटून कापूस उत्पानात ३० टक्के घट आली असून यंदा केवळ १४.४ लाख गाठी कापूस उत्पादन झाले आहे. राज्यात धान उत्पादनात ४ टक्के घट येऊन १२१.६ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. राज्याने २०१८-१९ मध्ये अन्नधान्य उत्पादन १५२.४ लाख टन होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. २०१७-१८ मध्ये राज्यात १६६.८ लाख टन अन्नधान्य उत्पादन झाले होते. तेलबियांमध्ये मोठी घट आंध्र प्रदेशात दुष्काळी स्थिती असल्यामुळे तेलबिया उत्पादनात मोठी घट आली आहे. तलेबियांमध्ये भुईमूग उत्पादन सर्वाधिक घटले आहे. भुईमूग उत्पादनात तब्बल ५३ टक्के घट होऊन राज्यात ४.८५ लाख टन उत्पादन होईल, असा अंदाज आहे. राज्यात मागील वर्षी तेलबिया उत्पादन २८.७ लाख टन झाले होते. यंदा घट होऊन २४.३ लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे.  कापूस, मका उत्पादन घटले कापूस उत्पादनात आंध्र प्रदेश आघाडीवरील एक राज्य आहे. परंतु  यंदा राज्यातील कापूस उत्पादक अनेक जिल्ह्यांत दुष्काळी स्थिती असल्याने उत्पादकतेवर परिणाम झाला आहे. राज्यातील कापूस उत्पादनात २०१८-१९ मध्ये तब्बल ३० टक्के घट आली आहे. बाजरी उत्पादनही २८ टक्क्यांनी घटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT