बोंड अळी निर्मूलनासाठी कृषी विभागाची हंगामपूर्व मोहीम
बोंड अळी निर्मूलनासाठी कृषी विभागाची हंगामपूर्व मोहीम 
मुख्य बातम्या

बोंड अळी निर्मूलनासाठी कृषी विभागाची हंगामपूर्व मोहीम

टीम अॅग्रोवन

नागपूर ः गेल्या वर्षी गुलाबी बोंड अळीचा झालेला प्रादुर्भाव आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्‍वभूमीवर या वर्षी हंगामपूर्वीच उपाययोजनांवर कृषी खाते भर देणार आहे. शेतकऱ्यांमध्ये या विषयावर जागृतीसाठी कृषी विद्यापीठ तज्ज्ञांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. 

गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून कापूस उत्पादक पट्ट्यातील शेतकरी दहशतीत आला आहे. यवतमाळ, नागपूर, वर्धा जिल्ह्यात बोंड अळीच्या प्रादुर्भावाचा फटका बसत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. गुलाबी बोंड अळी येण्यामागे एचटी, बीटी वाणांची लागवड हेदेखील एक कारण असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. 

या सर्व निरीक्षणाअंती गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता विविध उपाययोजनांच्या निष्कर्षावर कृषी पोचला आहे. त्यानुसार या हंगामात शेतकऱ्यांना पूर्वहंगामी कापूस लागवड करण्यापासूनदेखील परावृत्त केले जाणार आहे. त्याकरिता कृती आराखडाच कृषी विभागाने तयार केल्याची माहिती आहे.जून महिन्यातच शेतकऱ्यांनी कापसाची लागवड करावी. ज्यांच्याकडे पाण्याची सोय असेल त्यांनादेखील पूर्वहंगामी कापूस लागवडीपासून रोखले जाणार आहे. याविषयावर शेतकऱ्यांमध्ये जागृती व्हावी याकरिता लवकरच एका शेतकरी मेळाव्याचे आयोजन नागपूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय स्तरावर करण्यात येणार आहे.

पूर्वहंगामी कापूस लागवडीमुळे बोंड अळीला पूरक खाद्यान्नाचा पुरवठा होत त्यांची लाइफसायकल पूर्ण होईल. लाइफसायकल ब्रेक होण्यासाठी कापूस लागवड लवकर नको, असे सांगितले जाते. त्यामुळे कृषी विद्यापीठ तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात शेतकरी मेळावा घेऊन याविषयावर शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याचे प्रस्तावित आहे. - रवींद्र भोसले, विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : विदर्भात पावसाचा अंदाज; पावसासोबतच राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका कायम

Fodder News : विक्रीसाठी चारा उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करा; पशुसंवर्धन आयुक्तांचे आदेश

Agriculture Land : नसलेल्या जमिनीचा शोध!

Crop Management : जमीन, पाऊसमानानुसार करा कोरडवाहू पिकाचं नियोजन

Watermelon Cultivation : प्रयोगशीलता जपत केली खरबूज लागवड

SCROLL FOR NEXT