fertilizers
fertilizers  
मुख्य बातम्या

कृषी खाते म्हणते, पुरेशी खते उपलब्ध

टीम अॅग्रोवन

पुणे: राज्यात खताची टंचाई नाही. मात्र, यंदा मॉन्सून आधी आल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत पेरा देखील लवकर झाला. त्यामुळे खताच्या वापरात मोठी वाढ झाली. मात्र, राज्यात पुरेशी खते उपलब्ध आहेत, अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.  ‘‘युरियाची टंचाई नाही. मात्र, मागणीत वाढ झाली आहे. त्यामागे दोन कारणे आहेत. कोविडमुळे शेतकऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्याच पातळीवर खतांची जादा खरेदी करून साठा करून ठेवला आहे. तसेच मॉन्सून आधी व सर्वत्र चांगला झाल्यामुळे खत वापर आणि मागणीत उसळी दिसते आहे,’’ असे राज्याचे निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक विजयकुमार घावटे यांनी सांगितले. राज्यात गेल्या खरिपात जूनच्या पहिल्या आठवड्यात फक्त साडेसात लाख हेक्टर पेरा झाला होता. यंदा याच कालावधीत पेरा एक कोटी साडेसात लाख हेक्टर इतका झाला आहे. म्हणजेच विशिष्ट कालावधीत एक कोटी हेक्टरने पेरा जादा झाला आहे. त्यामुळे खत मागणी आणि वापरात बदल झाला आहे.  खरिपासाठी राज्याकरिता १५ लाख टन युरिया मंजूर झाला आहे. यातील १० लाख ३४ हजार टन युरिया यापूर्वीच उपलब्ध झाला आहे. २३ हजार टन युरिया सध्या वाहतुकीच्या साखळीत (ट्रान्झिट फेज) आहे. सप्टेंबर अखेर अजून सात लाख टनापेक्षा जास्त युरिया मिळणार असल्याने काळजी करण्याची गरज नाही, असे कृषी विभागाला वाटते. श्री. घावटे म्हणाले की, ‘‘गेल्या वर्षीचा पावणेचार लाख टन युरिया शिल्लक होता. त्यामुळे  युरिया असूनही काही ठिकाणी अकारण जादा खरेदीचे प्रकार दिसून येतात. अर्थात, पूर्व विदर्भ व मराठवाडा येथून मागणीनुसार हवा तितका युरिया पाठविण्यासाठी रेकचे नियोजन केले जात आहे.’’ राज्यात युरियासहित एकूण ४० लाख टन रासायनिक खते यंदाच्या खरिपासाठी पुरविली जाणार आहेत. त्यापैकी आजपर्यंत २३ लाख २४ हजार टन म्हणजेच ८४ टक्के खते उपलब्ध झालेली आहेत. उर्वरित खते टप्प्याटप्याने सप्टेंबरपर्यंत उपलब्ध होत जातील, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

Ocean Weather : हिंद महासागरात कायमस्वरूपी सागरी उष्ण लाटांची शक्यता

Bajari Harvesting : उन्हाळी बाजरी काढणीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT