कृषी विभाग
कृषी विभाग  
मुख्य बातम्या

लष्करी अळी आटोक्यात: कृषी विभाग

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यात दोन लाख ६७ हजार हेक्टर क्षेत्रातील अमेरिकन फॉल आर्मी वर्म कीड होती. मात्र, ९९ टक्के क्षेत्रात उपचार करण्यात आले असून, ३२२ गावांमधील प्रादुर्भाव आटोक्यात आला आहे, असे कृषी विभागाच्या एका अहवालात म्हटले आहे. पहिल्या टप्प्यात १६ जिल्ह्यांतील ३६१ गावांमध्ये किडीने ईटीएल (आर्थिक नुकसान पातळी) ओलांडली होती. मात्र, चार सप्टेंबरअखेर ३२२ गावांमधील प्रादुर्भाव आटोक्यात आला. फक्त १३८ गावांमध्ये सलग दुसऱ्या आठवड्यात ईटीएलच्या वर कीड होती, असे अहवालात म्हटले आहे. ..तरी उत्पादन घटत नाही कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, ५ ते ११ सप्टेंबर या कालावधीत ३६१ गावांत कीड आढळली. विशेष म्हणजे, २३३ गावांमध्ये नव्याने ही कीड आढळली आहे. मुळात कीड आढळली म्हणजे नुकसान झाले, असा अर्थ काढता येणार नाही. कारण, २५ टक्के प्रादुर्भाव असला, तरी उत्पादन विशेष घटत नाही, असे जागतिक अन्न संघटनाच सांगते आहे, असाही दावा कृषी विभाग करीत आहे. ८५८ शेती शाळा घेतल्या ''अमेरिकन फॉल आर्मी वर्म'' वर्मबाबत उपाययोजना केल्या नाहीत, हा मुद्दा कृषी विभागाच्या अहवालात फेटाळून लावला गेला आहे. "साडेपाच हजार गावांत या किडीचे सर्वेक्षण झाले. त्यात पुन्हा ८५८ गावांत शेतीशाळा घेऊन एक लाख ४९ हजार कामगंध सापळे आणि चार लाख ४९ लाख लुर्स वाटले गेले आहेत. २६ हजार ६३४ लिटर कीटकनाशके वाटण्यात आली. जनजागृतीची आम्ही एकही बाब सोडलेली नाही. विशेष म्हणजे बियाणे व कीडनाशके उत्पादक कंपन्यांना देखील जिल्हे वाटून दिले. यामुळे जनजागृती मोहीम यशस्वी झाली," असा दावा कृषी विभागाने केला आहे. कीड नियंत्रण मोहीम यशस्वी "जिल्हा नियोजन निधीचा वापर, उद्योगातील सीएसआर निधी, कृषी विद्यापीठांच्या मदतीने १७९ सल्ले, पाच हजार गावबैठका, २८ हजार घडीपत्रिका वाटप आणि सहा लाख एसएमएसचा प्रसार, अशी एकत्रित भव्य मोहीम राबविण्यात आल्याने कीड नियंत्रण चांगले झाले आहे," असेही कृषी विभागाचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT