निवड पत्र, पूर्वसंमतीने औजारे खरेदी करण्याचे कृषी विभागाचे अावाहन
निवड पत्र, पूर्वसंमतीने औजारे खरेदी करण्याचे कृषी विभागाचे अावाहन 
मुख्य बातम्या

वड पत्र, पूर्वसंमतीने औजारे खरेदी करण्याचे अावाहन

टीम अॅग्रोवन

नगर : "उन्नत शेती-समृद्ध शेतकरी'' मोहिमेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून औजारांची मागणी केलेल्या सगळ्या लभार्थ्यांना (ट्रॅक्‍टर वगळता) औजारांचा लाभ मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी औजारांची मागणी केलेली आहे त्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून निवड पत्र व पूर्वसंमती घ्यावी आणि औजारे खरेदी करून प्रस्ताव सादर करण्याचे अावाहन केले आहे. "उन्नत शेती-समृद्ध शेतकरी'' मोहिमेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून शेतकऱ्यांना ट्रॅक्‍टरसह पेरणी यंत्र, रोटावेटर, कल्टी, ब्रशकटर, फवारणी यंत्र अशा शेती औजारांचा अनुदानावर लाभ दिला जातो. (एप्रिल २०१७) या महिन्यात शेतकऱ्यांकडून कृषी विभागाने मागणी अर्ज घेतले होते. त्यानुसार ट्रॅक्‍टरसाठी सहा हजार नऊशे तेरा तर अन्य औजारांसाठी सात हजार चारशे ५५ असे १४ हजार ३६८ अर्ज कृषी विभागाकडे प्राप्त झाले होते. या सर्व लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जवळपास ३९ कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे.  आलेल्या अर्जाची सोडत पद्धतीने निवड करून स्वतंत्र ज्येष्ठता यादी तयार केलेली त्यातील सात हजार एकशे ९९ लाभार्थ्यांना निवड पत्र तर तीन हजार ६३ लाभार्थ्यांना आतापर्यंत औजारे खरेदी करण्यासाठी पूर्वसंमती दिलेली आहे. अभियानातून नगर जिल्ह्यासाठी सुरवातीला साडेतेरा कोटी रुपये व नंतर पावणेबारा कोटी असे पंचवीस कोटी अठरा लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यातील एकवीस कोटी रुपये प्राप्तही झाले आहेत. जास्तीचा निधी प्राप्त झालेला असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना औजारांचा लाभ देणे शक्‍य आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या सगळ्याच शेतकऱ्यांनी औजारांसाठी (ट्रॅक्‍टर वगळून) तालुका कृषी कार्यालयातून नवड पत्र व पूर्वसंमती घ्यावी आणि औजारांची खुल्या बाजारात खरेदी करता येणार आहे.  अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना अन्य औजारांसह ट्रॅक्‍टरही खरेदी करता येणार आहे. त्यामुळे खरेदीनंतर अनुदानासाठी प्रस्ताव सादर करावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे व विस्तार विभागाचे तंत्र अधिकारी अशोक संसारे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT