संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

कृषी सहायक, ग्रामसेवक देणार पूरग्रस्तांना एक दिवसाचे वेतन

टीम अॅग्रोवन

अकोला : राज्यातील पूरस्थितीच्या संकटात नागरिकांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने एक दिवसाने वेतन देण्याचे जाहीर केले आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संघटनेच्यावतीने पत्र पाठविण्यात आले आहे. राज्यात कार्यरत १० हजार कृषी सहायक हे ऑगस्ट महिन्याच्या वेतनातून मदत करणार आहेत. तसेच, राज्यातील २२ हजार ग्रामसेवक सुद्धा आपले एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांना देणार आहेत. याबाबत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना ग्रामसेवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष एकनाथराव ढाकणे, सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी पत्र पाठवले आहे.

कोल्हापूर, सातारा, सांगलीसह इतर भागांत पुरामुळे अतोनात नुकसान झाले आहे. या पुरामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत कृषी सहायक संघटनेने कृषी विभागात कार्यरत दहा हजार कृषी सहायकांचे एक दिवसाचे वेतन देण्याचे जाहीर केले आहे. याबाबत संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ बाचकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे तसे पत्र पाठविले आहे. यासोबतच आवश्यकतेप्रमाणे मदतकार्यात योगदान देण्याचेही संघटनेने म्हटले आहे. ऑगस्ट महिन्याच्या वेतनातून ही रक्कम मुख्यमंत्री मदतनिधी खात्यात वर्ग करण्याची विनंती करण्यात आली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

Sugar Commissionerate : साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली

Loksabha Election 2024 : खडकवासला मतदार संघातील मतदान केंद्रांना साहित्याचे वितरण

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

Banana Rate : खानदेशात केळी दरात मोठी घसरण

SCROLL FOR NEXT