शेतीमाल साठवणूक, तारण कर्ज, ब्लॉकचेनची माहिती थेट बांधावर Agricultural stocks, mortgage loans, Blockchain information directly on the dam
शेतीमाल साठवणूक, तारण कर्ज, ब्लॉकचेनची माहिती थेट बांधावर Agricultural stocks, mortgage loans, Blockchain information directly on the dam 
मुख्य बातम्या

शेतीमाल साठवणूक, तारण कर्ज, ब्लॉकचेनची माहिती थेट बांधावर

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्य वखार महामंडळाच्या शेतीमाल साठवणुकीच्या विविध योजना, ब्लॉकचेन योजना, तारण कर्ज योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी वखार महामंडळ, कृषी विभाग आणि सहकार विकास महामंडळाद्वारे वखार आपल्या दारी अभियान विविध १५ जिल्‍ह्यांमध्ये कार्याशाळांद्वारे राबविण्यात येत आहे, अशी माहिती वखार महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे यांनी दिली. तावरे म्हणाले, ‘‘शेतकरी विविध तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतमालाचे भरघोस उत्पादन घेत आहे. सध्या काढणीचा हंगाम असून, बाजारपेठेत अचानक मोठ्या प्रमाणावर शेतीमालाची आवक होऊन दर पडण्याची शक्यता असते. यामध्ये शेतकऱ्यांकडे दर्जेदार शेतीमाल असून, सुद्धा दर कोसळल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे नुकसान एका एका पिकाचा विचार केला तर ते कोट्यवधी रुपयांचे होते. हे नुकसान टाळून शेतकऱ्यांना शेतीमाल साठणूक, बाजारपेठेच्या अभ्यासाद्वारे (मार्केट इंटेलिजन्स) शेतीमाल विक्री कधी आणि केव्हा करावी या बाबतची माहिती कार्यशाळांमधून दिली जाणार आहे. यामध्ये राज्य वखार महामंडळाची शेतीमाल साठवणूक योजना, तारण कर्ज योजना, ब्लॉकचेन योजना, लहान साठवणूक केंद्रे (वखार) बांधणी योजना आदी विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे.’’

  ...येथे होतील कार्यशाळा या कार्यशाळा उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, वाशीम, खामगाव (बुलडाणा), अकोला, दर्यापूर (अमरावती), यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अर्जुनी मोरगाव (गोंदिया), तुमसर (भंडारा) आदी ठिकाणी होणार आहेत. कार्यशाळेबाबत भाऊ टेमकर (९४२२८७५९५६), एस. पी. बोरसे (नागपूर - ९१५८००१३१५), ए. डी. मासाळ (अमरावती - ९९६७२८९९९३) के. आर. पवार (लातूर - ९१५८००१३४०) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वखार महामंडळाद्वारे करण्यात आले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT