Agricultural commodities to be sold locally: Bhujbal
Agricultural commodities to be sold locally: Bhujbal 
मुख्य बातम्या

शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळ

टीम अॅग्रोवन

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. भविष्यात आदिवासी समाजाला रोजगाराची संधी या उपबाजारातून निर्माण होणार आहे. येथे होणाऱ्या उपबाजारामुळे जवळपासच्या शेतकऱ्यांचा दळण वळणाचा मोठा प्रश्न सुटणार आहे. स्थानिक पातळीवरच त्यांचा माल विकला जाणार आहे, असे मत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. 

त्र्यंबकेश्वर येथील नाशिक बाजार समितीच्या अंतर्गत ‘त्र्यंबकेश्वर उपबाजार आवार भुमिपुजन आणि कोनशीला अनावरण झाले. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जि. प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार हिरामण खोसकर, सरोज आहिरे, नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे, उपसभापती युवराज कोठुळे, नगराध्यक्ष पुरषोत्तम लोहगावकर, त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे सभापती मोतीराव दिवे, गटविकास अधिकारी मुरकुटे उपस्थित होते. 

भुजबळ म्हणाले, ‘‘या आवारात तयार होणाऱ्या इमारतीत परवडेल, अशी अमानत रक्कम निश्चित करुन गाळे वाटप किंवा इतर सुविधांचा लाभ देताना स्थानिक शेतकऱ्यांना प्राधान्य द्या. लॉकडाऊनमध्ये शेतीकामे ॲनलॉक होती. त्यामुळे  येणाऱ्या काळातील सोशल डिस्टन्सिंगचे महत्व लक्षात घेवून शेतकऱ्यांसाठी अशा छोट्या स्वरुपाचे बाजार सुरु होणे आवश्यक आहे. गर्दीच्या अनुषंगाने बंदिस्त बाजारापेक्षा खुली बाजार पध्दती सुरु करावी. येणाऱ्या काळात टर्मिनल मार्केट तयार करण्यासाठी व पॅकिंग पध्दतीकडे लक्ष देण्यात येणार आहे. ``

कांदा प्रश्नी महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकत्रित येवून कांद्याची निर्यात सुरु करण्यासाठी केंद्र सरकारला निवेदन देणे आवश्यक आहे, असेही भुजबळ यांनी सांगितले.  नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत ‘त्र्यंबकेश्वर उपबाजार आवाराच्या’ माध्यमातून कमी अनामत रक्कम घेऊन आदिवासींना देखील या व्यापारात उतरण्याची संधी द्यावी. बाजार आवार उभारण्याबरोबरच शेतकऱ्यांसाठी २४ तास वीज व पाणी उपलब्ध झाले, तर बाजार समितीत शेतमाल येण्याचे प्रमाण वाढेल, असे मत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT