माजी खासदार कै. शंकरराव काळे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन
माजी खासदार कै. शंकरराव काळे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन 
मुख्य बातम्या

कृषी प्रदर्शन आधुनिक शेतीची वाट दाखविणारे ठरेल

टीम अॅग्रोवन

कोपरगाव, जि. नगर ः शेतीच्या पाण्यासाठी व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी कर्मवीर कै. शंकरराव काळे यांनी आयुष्य वेचले आहे. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांना आणि तरुण पिढीला आधुनिक शेतीची वाट दाखविण्यास कारणीभूत ठरेल, असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी केले. माजी खासदार कै. शंकरराव काळे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे, ज्येष्ठ नेते छबुराव आव्हाड, कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण, उपाध्यक्ष नारायण मांजरे, कारखान्याचे उपाध्यक्ष सूर्यभान कोळपे, पंचायत समितीच्या सभापती अनसूया होन, उपसभापती अनिल कदम, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते यांच्या सह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. श्री. काळे म्हणाले, की शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्याची शाश्‍वत व्यवस्था नसल्याने शेती तोट्यात जाते. शेती करणाऱ्या तरुण पिढीचा भ्रमनिरास होतो आहे. तरीही नव्या संशोधनाच्या आधारे तयार करण्यात आलेली औजारे, नव्या लागवड पद्धती, सौर उपकरणे, नवी यंत्रे, बियाणे व औषधे, नव्या जातींची बियाणे व नवे तंत्रज्ञान यांचा आधार घेऊन कमीत कमी श्रमात व कमी खर्चात आधुनिक शेती करणे शक्‍य आहे. कृषी प्रदर्शन भरविण्याचा हेतू हाच आहे.  या प्रदर्शनात शंभराहून अधिक नामांकीत कंपन्यांनी सहभाग घेतला. शेतकऱ्यांसमोर आधुनिक शेतीचा रोड मॅप उभा केला. त्यांना अल्पदरात या प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी आम्ही दिली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT