कृषी विभाग म्हणते, पॉलिहाउस, शेडनेट नुकसान भरपाईच्या सूचनाच नाहीत
कृषी विभाग म्हणते, पॉलिहाउस, शेडनेट नुकसान भरपाईच्या सूचनाच नाहीत 
मुख्य बातम्या

कृषी विभाग म्हणते, पॉलिहाउस, शेडनेट नुकसान भरपाईच्या सूचनाच नाहीत

टीम अॅग्रोवन

जळगाव ः खानदेशात १ ते ११ जून यादरम्यान झालेल्या वादळी पावसात धुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री, जळगावमधील चोपडा, यावल, जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर आदी भागांतील अनेक शेतकऱ्यांच्या पॉलिहाउस, शेडनेटचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. परंतु या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाईसंबंधी कृषी विभागाकडे स्पष्ट सूचनाच नसल्याची माहिती समोर आली आहे.  शेडनेट किंवा पॉलिहाउसमध्ये जी पिके असतात, त्यांच्या नुकसानीची भरपाई नुकसानग्रस्तांना देण्याचे प्रस्ताव कृषी विभाग तयार करीत आहे. परंतु पॉलिहाउसच्या नुकसानीसंबंधी कुठलीही भरपाई देण्यासंबंधीच्या स्पष्ट सूचना कृषी विभागाला नसल्याने पंचनामे करताना पॉलिहाउस, शेडनेटचे नुकसान वगळले जात आहे. पॉलिहाउसमध्ये लागवड केलेली ढोबळी मिरची, फूलपीक किंवा इतर पिकांना तुटपुंजी भरपाई मिळणार आहे. कारण अनेक शेतकऱ्यांचे पॉलिहाउस हे १० ते २० गुंठ्यांचे आहेत आणि १० ते २० गुंठ्यांतील भाजीपाला किंवा फुलांच्या पिकासाठी तोकडी रक्कम १० गुंठ्यांसंबंधी चार ते पाच हजार रुपयेच शासनाकडून भरपाईपोटी नुकसानग्रस्तांना मिळतील, अशी स्थिती आहे.  शासनाकडून संरक्षित शेती म्हणून पॉलिहाउस, शेडनेटची योजना राबविली जात आहे. परंतु शेडनेट किंवा पॉलिहाउसचे नुकसान झाल्यास त्यासंबंधीची भरपाई का मिळत नाही असा मुद्दा धुळे, जळगाव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.  या वर्षी धुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री, शिरपूर भागांतील सुमारे २० शेतकऱ्यांचे पॉलिहाउस, शेडनेटचे वादळात कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. तर जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, रावेर, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, भडगाव भागांत मिळून सुमारे २० शेतकऱ्यांच्या शेडनेट, पॉलिहाउसचे वादळात नुकसान झाले. एक गुंठ्यातील पॉलिहाउस उभारण्यासंबंधी शेतकऱ्याला एकूण १० ते ११ लाख रुपये खर्च लागतो.  कृषी विभाग ः भरपाईबाबत सांगू शकत नाही पॉलिहाउस व शेडनेटच्या नुकसान भरपाईसंबंधी धुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील संबंधितांशी संपर्क साधला असता सूत्रांनी सांगितले, की आम्ही नुकसानग्रस्त पॉलिहाउसचे तिखी, शिरूड भागांत पंचनामे केले आहेत. परंतु भरपाई किती मिळेल, शेतकऱ्यांना किती पैसे मिळतील, हे आम्ही सांगू शकत नाही. कारण पॉलिहाउसच्या वादळात नुकसानीसंबंधीच्या भरपाईबाबत शासनाच्या किंवा वरिष्ठ कार्यालयाच्या स्पष्ट सूचनाच नाहीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT