बोंडअळीच्या प्रादुर्भावप्रकरणी सहा कंपन्यांविरुद्ध तक्रार
बोंडअळीच्या प्रादुर्भावप्रकरणी सहा कंपन्यांविरुद्ध तक्रार 
मुख्य बातम्या

बोंडअळीच्या प्रादुर्भावप्रकरणी सहा कंपन्यांविरुद्ध तक्रार

टीम अॅग्रोवन

अकोला ः जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने याप्रकरणी जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक मिलिंद जंजाळ यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. पुरेशे कागदपत्र, प्रयोगशाळेचे अहवाल व प्रकरणाशी संबंधित माहिती पोलिसांनी कृषी खात्याला सादर करण्यास सांगितली अाहे.   जिल्ह्यात बोंड अळीमुळे हजारो हेक्टरमधील कपाशी पिकाचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या जवळपास ११०० तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या अाहेत. या तक्रारींवर केवळ रँडम पद्धतीने तपासणीचे काम कृषी विभाग करीत अाहे. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेता शिवसेनेने नुकतेच (ता. २२) अाक्रमक होत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या अांदोलन केले. यानंतर जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक जंजाळ व शिवसेना कार्यकर्त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून सहा बीटी कंपन्यांविरोधात तक्रार दाखल केली. ही तक्रार पोलिसांनी दाखल केली. मात्र याप्रकरणी कारवाईसाठी अाणखी माहिती सादर करण्याबाबत कृषी विभागाला सांगितले अाहे. त्यानंतर गुन्हे दाखल करण्याबाबत पुढील प्रक्रिया केली जाणार अाहे.  बीटी कपाशी बीजी-२ उत्पादक कंपन्यांनी संबंधित बियाणे अधिकृत विक्रेत्यांमार्फत शेतकऱ्यांना विक्री करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली असल्याने  महाराष्ट्र कापूस बी-बियाणे अधिनियम २००९ चे उल्लंघन झाले आहे. त्यानुषंगाने संबंधित सहा बियाणे कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार प्रशासनाच्या वतीने जंजाळ यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात केली. या वेळी शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.  पंचनाम्यात दिसून अाले होते तथ्य जिल्ह्यात या खरीप हंगामात पेरणी केलेल्या बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने, पिकांचे नुकसान झाल्याच्या तालुकास्तरावर एक हजार ९८ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तालुकास्तरीय बीज निरीक्षकाने त्यापैकी २९६ तक्रारींची क्षेत्र पाहणी केली अाहे. प्राथमिक तपासणी अहवालानुसार जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीने मूर्तिजापूर व तेल्हारा तालुक्यात गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे दिसून येते. बीटी कपाशी बीजी २ वाणावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होणे अपेक्षित नसताना, कापूस पिकाचे नुकसान झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT