सच्चिंद्र प्रताप सिंह
सच्चिंद्र प्रताप सिंह  
मुख्य बातम्या

कृषी खात्याला दिशा देण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांचीच ः आयुक्त

टीम अॅग्रोवन

पुणे: कृषी खात्यातील अधिकाऱ्यांचे काम केवळ सरकारी योजनांची अंमलबजावणी करण्यापुरते मर्यादित नसून, कृषी खात्याला दिशा देण्याची जबाबदारीदेखील तुमचीच आहे, असे उद्गगार कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांना काढले.   ‘एनएचएम’ व विस्तार विभागाचे संचालक डॉ. सु. ल. जाधव यांच्या निवृतीनिमित्ताने आयुक्तालयाने आयोजित केलेल्या निरोपसोहळ्यात श्री. सिंह बोलत होते. या वेळी फलोत्पादन संचालक प्रल्हादराव पोकळे, सुभाष खेमनर, मच्छिंद्र घोलप व्यासपीठावर होते. ‘गेली ३२ वर्षे कृषी विस्ताराची आदर्श सेवा करणारे श्री. जाधव हे कृषी खात्यातील प्रत्येक जबाबदारी संयम व कौशल्याने पार पाडत होते. ते आमचा आदर्श होते,’ अशी भावना सर्व अधिकाऱ्यांनी या वेळी व्यक्त केली.  या वेळी आयुक्त म्हणाले, की सरकारी खात्यातून निवृत्त होताना फार कमी अधिकाऱ्यांच्या वाट्याला अशा स्वरूपाच्या सदिच्छा येतात. श्री. जाधव यांचे काम कृषी आयुक्तालयासाठी मैलाचा दगड आहे. अधिकारी म्हणून समाजाचे देणे लागतो ही भावना ठेवत त्यांनी सेवा केली. श्री. पोकळे यांनी जाधव यांच्या कामकाजाबाबत दिलेली माहिती त्यांचे कृषी सेवेचे महत्त्व सांगणारी आहे. कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत राहून सतत शिकले पाहिजे. कारण शेती व शेतकरी हेच आपले मुख्य घटक आहेत.  आयुक्तालयाकडून या वेळी श्री. जाधव व सौ. जाधव यांचा गौरव करण्यात आला. श्री. पोकळे म्हणाले, की कृषी खात्यात जयंत देशमुख, के. एन. देशमुख, एस. एल. जाधव आणि मी आमची घट्ट मैत्री होती. श्री. जाधव यांनी कृषी खात्याच्या सर्व योजनांमध्ये तसेच अडचणीतदेखील उत्कृष्ट सेवा बजावली. त्यांच्यात व माझ्यात गेल्या ३८ वर्षांत एकदाही मतभेद झाले नाहीत. आम्ही दोघांनी अतिशय आव्हानात्मक स्थितीत कृषी खात्यात भरपूर कामे केली. आता स्थिती वेगळी असून ९० टक्के डीबीटी लागली आहे. अजूनही पुढे सुधारणा होतील. मात्र, श्री. जाधव यांची उणीव आम्हाला कायम भासत राहील.  प्रल्हादराव पोकळे आता आयुक्तालयाचे पालक  कृषी आयुक्तालयात श्री. जाधव व श्री. पोकळे यांच्या प्रशासकीय निर्णयावर क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिशा मिळत होती. श्री. जाधव यांच्यानंतर आता श्री. पोकळे यांच्याकडेच ‘पालक’ म्हणून सर्वजण पाहत आहेत, असा उल्लेखदेखील कृषी अधीक्षक अधिकारी दादासाहेब सप्रे यांनी या वेळी केला. राज्यातील सर्व कृषी सहसंचालक व आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी तसेच सोलापूर जिल्ह्यातील शेतकरीदेखील या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT