विद्यापीठ करार
विद्यापीठ करार 
मुख्य बातम्या

कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्याचा करार

टीम अॅग्रोवन

अकोला ः  केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि राज्य शासनाच्या छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास व उद्योजकता अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या कार्यक्रमासाठी गुरुवारी (ता. १८) अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासोबत सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कमिटी सभागृहात आयोजित कृषी शैक्षणिक संस्थांच्या बैठकीत वैयक्तिक कृषी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यास सिमॅसिस लर्निंग एलएलपीस सहकार्य करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.  या वेळी कुलगुरू डॉ. विलास भाले हे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. डी. एम. मानकर, सकाळच्या वऱ्हाड आवृत्तीचे सहयोगी संपादक संदीप भारंबे, सिमॅसिस लर्निंगचे (एलएलपी) सहायक   सरव्यवस्थापक अमोल बिरारी यांची उपस्थिती होती. ़़़``या कृषी कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना रोजगारासाठी दिशा मिळेल. कौशल्यावर आधारित उत्पादनक्षम व्यवस्था निर्माण होऊन सामाजिक समृद्धी येईल,’’ असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले.   विद्यापीठाने जे कौशल्य विकासाचे कार्य हाती घेतले ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून, आपल्या इच्छाशक्तीतून यशस्वी करता येईल. केंद्र सरकारच्या कौशल्य विकास योजनेतून तरुणांना रोजगाराची चांगली संधी मिळणार आहे. सकारात्मक युवा पिढी घडविण्यासाठी, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी हा उपक्रम कौतुकास्पद व स्तुत्य आहे, असेही डॉ. भाले म्हणाले. या वेळी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातंर्गत कार्यरत २६ कृषी महाविद्यालयांचे प्राचार्य, कृषी विज्ञान केंद्रांचे प्रमुख तसेच क्रीडा अधिकारी उपस्थित होते. अमोल बिरारी यांनी प्रास्ताविकात या कौशल्य प्रशिक्षणाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT