अकोला येथे आदिवासींचा मोर्चा
अकोला येथे आदिवासींचा मोर्चा 
मुख्य बातम्या

मागण्यांसाठी अकोला येथे आदिवासींचा मोर्चा

टीम अॅग्रोवन

अकाेला   ः जिल्ह्यात असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसित आठ गावांमधील अादिवासींनी अापल्या न्याय हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे हे सर्व आदिवासी मोर्चेकरी अकाेट ते अकोला असे ५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर पायी चालून अाले.

अकोट तालुक्याला लागून मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या कोअर भागातील नागरतास, अमुना, बारूखेड, धारग, बुल्लरघाट, साेमठाणा बुद्रुक, साेमठाणा खुर्द व केलापाणी या अाठ गावांमधून अादिवासींना अकोट तालुक्यात पुनर्वसित करण्यात अाले अाहे. पुनर्वसन करताना त्यांना सुविधा देणे गरजेचे होते. मात्र असे झाले नाही. पायाभूत सुविधा मिळत नसल्याने हे आदिवासी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत अाहेत. यासाठी त्यांनी अापापल्या गावातून गुरुवारी (ता. ६) अकोल्यासाठी पायी कूच केली होती. शुक्रवारी (ता. ७) दुपारी हे आदिवासी अकोला शहरात दाखल झाले. महाराष्ट्र असंघटित कामगार काँग्रेसने या मोर्चाचे नेतृत्व केले.

प्रशासनाने केलेले पुनर्वसन हे नियमबाह्य झालेले असून त्यामध्ये नियाेजनाचा अभाव राहिलेला आहे. व्याघ्र प्रकल्पासाठी संपादित केलेल्या शेतजमिनीच्या माेबदल्यात शेतजमिनी न दिल्यामुळे, तसेच पुनर्मूल्यांकन न केल्यामुळे आदिवासी शेतकरी भूमिहिन झाले आहेत. या सर्व समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष माे. बदरूज्जमा यांच्या नेतृत्वात पुनर्वसित गावातील हजारो आदिवासींनी मोर्चात सहभाग घेतला.

अादिवासी शेतकऱ्यांना कमीत कमी पाच एकर व भूमिहिनांना २.५ एकर जमीन द्यावी, शेतजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यास ताबा मिळावा, पर्यायी जागेवर शेतजमीन द्यावी. जिल्ह्यात पेसा कायदा व अनुसूची पाच लागू करण्यात यावी, राेजगार, व्यवसायाची संधी मिळावी आदी मागण्या शासनाकडे करण्यात अाल्या अाहेत. 

दरम्यान, अकोला दौऱ्यावर अालेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या अादिवासींची भेट घेतली. विखे पाटील यांनी याविषयी जिल्हाधिकारी अास्तिककुमार पाण्डेय यांच्या साेबत याबाबत चर्चा केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT