शेतकऱ्यांचे पैसे मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन : रघुनाथदादा पाटील
शेतकऱ्यांचे पैसे मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन : रघुनाथदादा पाटील 
मुख्य बातम्या

शेतकऱ्यांचे पैसे मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन : रघुनाथदादा पाटील

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी यंदाची एकरकमी एफआरपी, गेल्या वर्षीचे प्रतिटन २०० रुपये आणि त्यावरील व्याज दिलेले नाही. जोपर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जात नाही, तोपर्यंत साखर आयुक्तांच्या कार्यालयासमोर सुरू असेलेले ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी येथे दिला.   पत्रकार परिषदेत श्री. पाटील म्हणाले, ‘‘कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील ३७ साखर कारखान्यांनी यंदा गळीत झालेल्या उसाचे एक हजार २३६ कोटी थकविले आहेत. गत हंगामातील २९ कोटी थकविले. शासन आणि कारखानदार याकडे लक्ष देत नाहीत. शासन आणि साखर कारखाने यांची मिलिभगत आहे. त्यामुळे कारखानदारांना वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही. जी थकीत रक्कम आहे, ती दिलेल्या रकमेवरील व्याज मिळाल्याशिवाय पुणे येथील आंदोलन मागे घेतले जाणार नाही.’’  ज्या कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्कम दिलेली नाही, अशा कारखान्यांनी कायदा मोडला आहे. त्यांना उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार गाळप परवाना देता कामा नये. तरीही, शासनाच्या सांगण्यावरून साखर आयुक्तांनी परवाने दिलेले आहेत. या वेळी ॲड. माणिक शिंदे, शिवाजी माने, पी. जी. शिंदे, धनाजी चडमुंगे, ॲड. माणिक शिंदे, अजित पाटील, राजू कुरंदाळे उपस्थित होते.  राजू शेट्टींचे आंदोलन योग्यच  एकरकमी "एफआरपी''साठी खासदार राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांच्या कार्यालयावर काढलेला मोर्चा आणि केलेले ठिय्या आंदोलन योग्यच होते, असे कौतुक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी  केले. रघुनाथदादाप्रणित शेतकरी संघटनेने साखर आयुक्त कार्यालसमोर आंदोलन सुरू केले आहे. यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन श्री. पाटील यांनी केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT