Hamibhav
Hamibhav  
मुख्य बातम्या

हमीभावासाठी अंगाला हळद लावून आज आंदोलन : भूमिपुत्र शेतकरी संघटना

टीम अॅग्रोवन

वाशीम: हळदीला दहा हजार रुपये हमीभाव मिळावा या प्रमुख मागणीसह हळद उत्पादकांच्या समस्या सरकारने सोडवाव्या यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या नेतृत्वात सोमवारी (ता. २५) हळद अंगाला लावून आंदोलन केले जाणार आहे. याबाबत संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तातडीने निवेदन पाठवला आहे. 

हळद हे महाराष्ट्रातील प्रमुख मसाले पीक आहे. आयुर्वेदिक औषधी गुणधर्म असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड करतात. मात्र, या वर्षी कोरोनाच्या संकटाने हळदीला चार ते पाच हजार इतका अत्यल्प भाव मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. हळद हे वर्षभराचे पीक असून उत्पादन खर्च मोठा आहे. सध्याचे भाव पाहता उत्पादन खर्चही निघणे शक्य नाही. त्यामुळे हळदीला किमान दहा हजार रुपये हमीभाव शासनाने द्यावा या प्रमुख मागणीसह हळदीला पीकविमा संरक्षण देण्यात यावे, शासनाने हळदीची खरेदी करावी, नैसर्गिक आपत्तीत हळद पिकाला मदत देण्यात यावी, शासनाच्या विविध योजने अंतर्गत यांत्रिकीकरण व सिंचनासाठी लागणारे साहित्य हळद उत्पादक शेतकऱ्यांना प्राधान्याने देण्यात यावे, पीककर्ज वाटपात एकरी पन्नास हजार रुपये पीककर्ज हळद उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन केले जात आहे. 

शेतकरी अंगाला हळद लावून मागणीचे फलक हातात धरून छायाचित्रे काढून शासनाला पाठवतील, अशी माहिती जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार यांनी दिली आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त हळद उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष उत्तमराव आरु यांनी केले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Market : दरात तेजीच्या अपेक्षेने तूर उत्पादकांनी विक्री रोखली

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा येलो अलर्ट

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

SCROLL FOR NEXT