डिग्रस जहांगीर येथे धरणे आंदोलन सुरु करण्यात आले
डिग्रस जहांगीर येथे धरणे आंदोलन सुरु करण्यात आले 
मुख्य बातम्या

सेलू, पाथरी तालुक्यांत कर्जमुक्तीसाठी धरणे आंदोलन सुरू

टीम अॅग्रोवन

परभणी : शेतकऱ्यांचे ३० जून २०१९ पर्यंतचे संपूर्ण शेतीकर्ज माफ करून संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, यासह अन्य मागण्यांसाठी सेलू, पाथरी तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी बुधवारपासून (ता. २) गावांमध्ये मी शेतकरी आंदोलनांतर्गत बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे. जाचक अटी, निकषांमुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून अजूनही वंचित राहिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारविरुद्ध तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. फसव्या कर्जमाफीच्या निषेधार्थ तसेच ३० जून २०१९ पर्यंत सर्व शेती कर्ज विनाअट माफ करून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी, शेतीमालाला दीडपट हमीभावाचा कायदा करावा या प्रमुख मागण्यांसाठी सेलू तालुक्यातील डिग्रस जहांगीर, करडगाव, साळेगाव, देऊळगाव, झोडगाव, खवणे पिंपरी, सावंगी ताठे आदी २५ गावांमध्ये हे आंदोलन सुरू करण्यात आले.

पाथरी तालुक्यातील निवळी, वडी, खेडुळा, हादगाव नखाते, गोपेगाव आदी १५ गावांतील शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. जिंतूर, मानवत तसेच अन्य तालुक्यांतील शेतकरीसुद्धा पुढील एक-दोन दिवसांत आंदोलन सुरू करणार आहेत. परभणी जिल्ह्यातील किमान १०० गावांतील शेतकरी कर्जमुक्तीच्या लढ्यात सहभागी होणार आहेत. ‘मी शेतकरी’ या नावाने हे आंदोलन केले जात आहे, असे आंदोलनाचे समन्वयक रामेश्‍वर पौळ यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : विदर्भात पावसाचा अंदाज; पावसासोबतच राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका कायम

Fodder News : विक्रीसाठी चारा उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करा; पशुसंवर्धन आयुक्तांचे आदेश

Agriculture Land : नसलेल्या जमिनीचा शोध!

Crop Management : जमीन, पाऊसमानानुसार करा कोरडवाहू पिकाचं नियोजन

Watermelon Cultivation : प्रयोगशीलता जपत केली खरबूज लागवड

SCROLL FOR NEXT