ग्रामसेवकांचे आंदोलन
ग्रामसेवकांचे आंदोलन 
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यात ग्रामसेवकांचे आंदोलन सातव्या दिवशीही सुरूच

सकाळ वृत्तसेवा

शिर्सुफळ, जि. पुणे : आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी राज्यातील ग्रामसेवकांनी सुरू केलेले बेमुदत कामबंद आंदोलन मंगळवारी (ता. २७) सातव्या दिवशीही सुरूच होते. या आंदोलनात जिल्ह्यातील ११४२ ग्रामसेवक सहभागी झाले आहेत. जिल्ह्यातील एक हजार चारशे पाच ग्रामपंचायतींपैंकी कंत्राटी ग्रामसेवक असलेल्या मोजक्‍या ग्रामपंचायतींचे कामकाज फक्त सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील चौदाशेहून अधिक ग्रामपंचायतींचे कामकाज विस्कळित झाले आहे. 

राज्यातील ग्रामसेवकांनी ९ ऑगस्टपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील जिल्हा परिषदा आणि विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मंत्र्यांना निवेदने देण्यात आली. त्यानंतर १९ ऑगस्ट रोजी ग्रामविकास विभाग आणि ग्रामसेवक युनियनच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही यावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार २२ ऑगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 

राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. या पार्श्‍वभूमीवर ग्रामपंचायतींमध्ये विविध कामे पूर्ण करण्यासाठी धावपळ सुरू असताना ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे कामकाज ठप्प झाले आहे. यामुळे सरकारने ग्रामसेवकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तत्काळ आंदोलनातून मार्ग काढणे आवश्‍यक आहे, असे कटफळचे सरपंच  सारिका मोकाशी यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT