दूध दरप्रश्नी आंदोलन
दूध दरप्रश्नी आंदोलन 
मुख्य बातम्या

बुलडाणा, वाशीममध्ये दूध दरप्रश्‍नी अांदोलनाची धग कायम

टीम अॅग्रोवन

अकोला  ः दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दर वाढवून मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तीन दिवसांपासून अांदोलन सुरू अाहे. तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.१८) बुलडाणा, वाशीममध्ये आंदोलनाची धग कायम होती. बुधवारी खामगाव तालुक्यातील मांडका गावात ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची प्रेतयात्रा काढून दहन केले. दुसरीकडे वाशीम जिल्ह्यात रिसोड येथे काही पदाधिकाऱ्यांनी चक्क गाढवाला दूध पाजून सरकारचा निषेध नोंदवला.

खामगाव तालुक्यातील मांडका गावात श्याम अवथळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची प्रेतयात्रा काढून दहन केले. दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य न झाल्यास मंत्र्यांच्या गाड्या पेटवू असा इशारा या वेळी अवथळे यांनी दिला. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गिरीधर देशमुख, शेख युनूस भाई, अनिल मिरगे, सोपान खंडारे, रामकृष्ण जुमळे, संजय बोचरे, विठ्ठल महाले, रोशन देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी गाढवाला दूध पाजण्याचा प्रयत्न करीत शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.  

दुधाच्या वाहनाच्या काचा फोडल्याचा अारोप असलेले ‘स्वाभिमानी’चे मोताळा तालुकाध्यक्ष सय्यद वसीम यांना बोराखेडी पोलिसांनी मंगळवारी (ता.१७) सकाळी अटक केली. न्यायालयात हजर केले असता जामिनावर सुटका करण्यात आली. या प्रकरणातील इतर आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत अाहेत. रविवारी (ता.१५) मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास संतप्त कार्यकर्त्यांनी मोताळा-बुलडाणा मार्गावरील वाघजाळ फाट्यानजीक दूध वाहतूक करणाऱ्या आयशर वाहनाच्या काचा फोडून दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकल्या होत्या.

‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी मेहकरमध्ये बुधवारी (ता.१८) पहाटे दूधाचे टँकर अडवून फोडले. बुधवारी सकाळी चिखली शहरात बस अडवून दगडफेक करण्यात अाली. चिखलीत गोविंद डेअरीचे वाहन अडवून त्यातील सर्व दूध रस्त्यावर फेकण्यात आले. जळगाव जामोद तालुक्यात निंभोरा फाट्याजवळ बुधवारी दुपारी बस फोडण्यात अाली. देऊळगावराजात कार्यकर्त्यांनी दुधाची दोन वाहने अडवून त्यातील दूध रस्त्यावर ओतले. बुलडाणा शहरात टिपू सुलतान चौकात कार्यकर्त्यांनी अांदोलन केले. वाशीम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात चांडस गावाजवळ बुधवारी दुपारी बस फोडली.

अाजपासून चक्काजाम आंदोलन दूध उत्पादकांच्या मागणीसाठी सुरू असलेले हे आंदोलन अधिक तीव्र केले जाणार अाहे. शेतकरी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता.१९) अापल्या घरची जनावरे, संपूर्ण कुटुंब, भाजीभाकरी घेऊन रस्त्यावर उतरावे. जोपर्यंत सरकार दूध उत्पादकांची मागणी मान्य करीत नाही तोवर रस्त्यावरून उठायचे नाही, असे अावाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

Ocean Weather : हिंद महासागरात कायमस्वरूपी सागरी उष्ण लाटांची शक्यता

Bajari Harvesting : उन्हाळी बाजरी काढणीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT