agitation
agitation 
मुख्य बातम्या

कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन

टीम अॅग्रोवन

नगर : कृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग पुर्वलक्षी प्रभावाणे लागू करण्यासाठी आणि दहा, वीस व तीस वर्षानंतर अनुज्ञेय ठरणारी तीन लाभांच्या सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना लागू करावी, यासह अन्य मागण्यांसाठी मंगळवारी (ता.२७) राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून अंदोलन सुरु केले.  मुख्यालयासमोर घोषणाबाजी करत मान्य करण्याची मागणी करत निवेदन दिले. दखल घेतली नाही तर २ नोव्हेंबरला लेखणी बंद करणार असल्याचे सांगण्यात आले.  राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत २५००, अकोल्याच्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत १२००, परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत १६०० व दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत २५०० कर्मचारी, अधिकारी, प्राचार्य सहभागी झाले होते.  प्रत्येक महाविद्यालयाच्या मुख्यालयी तसेच प्रक्षेत्रावर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून अंदोलन करत घोषणाबाजी केली. मागण्या मान्य झाल्या नाही तर  २ ते ५ नोव्हेंबर पर्यंत लेखणी बंद आंदोलन करण्यात येईल. ६ आक्टोबरला सामुहिक रजा देवून आंदोलन आणि ७ आक्टोबरपासून बेमुदत लेखणीबंद आंदोलन करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. कृषी विद्यापीठांच्या अंतर्गत येणाऱ्या मुख्यालय, कृषी महाविद्यालये, संशोधन केंद्रे, कृषी तंत्र विद्यालये, विभागीय विस्तार केंद्रातील कर्मचाऱ्यांनी अंदोलनात सहभाग घेतला. ‘‘चारही कृषि विद्यापीठाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात येत्या दोन-तीन दिवसांत शासनाकडून महत्वाचा निर्णय होईल अशी अपेक्षा आहे,’’ असे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचीव मोहन वाघ म्हणाले. या वेळी डॉ. उत्तम कदम, मच्छिंद्र बाचकर, गणेश मेहेत्रे,  मच्छिंद्र बेल्हेकर,  डॉ. संजय कोळसे,  सुरेखा निमसे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maize Production : उत्पादनवाढीसाठी ‘गेमा’ची मका वाढवा मोहीम

Government Contractor Movement : सर्व विभागांतील कंत्राटदारांचे ७ मेपासून काम बंद आंदोलन

Loksabha Election : निवडणुकीच्या पाहणीसाठी २३ देशांचे ७५ अभ्यासक दाखल

Tur Market : दरात तेजीच्या अपेक्षेने तूर उत्पादकांनी विक्री रोखली

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT