नाट्यमय घडामोडीनंतर स्थायी समितीचे पद रिक्त
नाट्यमय घडामोडीनंतर स्थायी समितीचे पद रिक्त 
मुख्य बातम्या

पुणे : नाट्यमय घडामोडीनंतर स्थायी समितीचे पद रिक्त

टीम अॅग्रोवन

पुणे : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीच्या रिक्त पदाच्या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांनी शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने नाट्यमय पेचप्रसंग उभा राहिला. त्यामुळे स्थायीचे हे पद रिक्त ठेवण्याचा आणि आचारसंहितेनंतर पुन्हा नव्याने निवडणूक घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते यांनी घेतला.

कॉंग्रेसच्या सदस्या श्रीमती रत्नप्रभा पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या स्थायी समितीच्या एका पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यासाठी कॉंग्रेसकडून अंकिता पाटील आणि दत्ता झुरंगे यांनी अर्ज दाखल केला होता. सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत निवडणुकीत माघार घेण्यासाठी वेळ दिला. मात्र, मुदतीत काँग्रेसच्या अंकिता पाटील आणि दत्ता झुरंगे निवडणुकीतून माघार घेण्यास तयार नव्हते. त्यावेळी मतदान घेण्याबाबत चर्चा सुरू असतानाच, अचानक दोघांनीही माघार घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे सभागृहापुढे पेच निर्माण झाला. शेवटी अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी स्थायी समितीची निवडणूक प्रक्रिया थांबविली. या आधीही कॉंगेसमधील अंतर्गत वादामुळे २२ ऑगस्ट रोजीची सभा तहकूब करण्यात आली होती, आता नाट्यमय घडामोडीने सदस्य पदाची निवडणूक लांबणीवर पडली असून,  पुन्हा नव्याने प्रक्रिया राबवावी लागणार आहे.  

झुरंगे यांनी मी काँग्रेसमधील एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. माझी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य झालो आहे. मी कॉंग्रेचा तळागाळातील कार्यकर्ता आहे. पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या निर्णयानुसारच मी निवडणुकीत उभा राहिलो आहे. मला राजकीय वरदहस्त नसल्याने घराणेशाही टाळत मला उमेदवारी मिळावी यासाठी सभागृहानेच मला न्याय द्यावा, असे आवाहन त्यांनी सभागृहाला केले. 

तोडगा निघत नसल्याने अखेर अंकिता पाटील यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. तसे पत्र त्यांनी अध्यक्षांना दिले. पाटील म्हणाल्या, माझ्या आजीच्या जागेवर मी निवडून आले. मी सर्वात लहान सदस्य आहे, तसेच या माध्यमातून मला तरुण मुलींचे आणि महिलांचे प्रश्न मांडायचे होते. पण, माझ्या राजकीय जीवनाच्या सुरवातीलाच राजकारण होत असल्याने मला याचे दुख: होत आहे. यामुळे मी निवडणुकीतून माघार घेत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT