संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

नाताळनंतर द्राक्षांची मागणी वाढली

टीम अॅग्रोवन

सांगली : दिवसेंदिवस थंडी वाढू लागली आहे. द्राक्षाची फुगवण कमी होते आहे. याचा परिणाम द्राक्षांवर झाला असल्याने द्राक्षांची गोडी कमी झाली आहे. त्यामुळे द्राक्षाला मागणी कमी होती. परिणामी दरही कमी अधिक प्रमाणात होते. मात्र नाताळनंतर द्राक्षाला मागणी वाढली असल्याने प्रतिकिलोस १० ते १२ रुपये वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे. अर्ली फळ छाटणी घेतलेले द्राक्ष विक्रीस सुरवात झाली आहे. पश्‍चिम बंगाल, कोलकता, बांगलादेश या भागातील व्यापारी सांगली जिल्ह्यात दाखल झाले आहे. जिल्ह्यात सध्या पाच ते दहा टक्के क्षेत्रातील द्राक्षे बाजारपेठेत येऊ लागली आहेत. द्राक्षाच्या दरात १० ते १२ रुपये प्रति किलोला वाढ मिळत आहे. मात्र, वाढत्या थंडीमुळे द्राक्षाची गोडी कमी झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

नाताळनंतर द्राक्षाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहेत. पुढील आठवड्यापासून निर्यातक्षम द्राक्षे सुरू होतील. त्यामुळे द्राक्षाचे दर अजून पाच ते दहा रुपयांनी वाढतील, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत.

निर्यातक्षम द्राक्षबागेसाठी यंदाचा हंगाम चांगला आहे. उत्पादनही अपेक्षेप्रमाणे मिळेल अशी आशा आहे. गेल्या वर्षीपेक्षा निर्यातक्षम द्राक्षाला चांगले भाव मिळण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. - पांडुरंग जाधव, निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक शेतकरी, पळशी, ता. खानापूर

थंडीमुळे द्राक्षाची गोडी कमी झाली आहे. त्यामुळे कमी-अधिक प्रमाणात द्राक्षाला मागणी आहे. थंडीमुळे भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्यास प्रारंभ झाला आहे. पण पुढील आठवड्यात द्राक्षाचे दर वाढण्याची शक्‍यता आहे. रघुनाथ झांबरे,  द्राक्ष उत्पादक शेतकरी, डोंगरसोनी, ता. तासगाव.

द्राक्षाचे दर (प्रतिचार किलोस) शरद  :   ३५० रुपये ज्योती सीडलेस :    ४०० सुपर सोनाक्का  :   २७५ ते ३०० सोनाक्का व माणिक चमन  :  १७५ ते २००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

Natural Disaster in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरवर निसर्ग कोपला; अतिवृष्टी, भूस्खलनानंतर भूकंपाचे धक्के

Kadavanchi Watershed Project : कडवंची ‘वॉटर बजेट’द्वारे समृद्धी

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

SCROLL FOR NEXT