संग्रहित चित्र
संग्रहित चित्र 
मुख्य बातम्या

राज्य सेवा आयोगाकडून ३४२ पदांच्या भरतीसाठी जाहिर प्रसिध्द

टीम अॅग्रोवन

मुंबई : राज्य सेवा आयोगाकडून शासनाच्या विविध विभागांतर्गत एकूण ३४२ पदांच्या भरतीकरता सोमवारी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, यामध्ये महसूल विभागातील २३० पदांची मेगा भरती करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, राज्यात मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १६ टक्के आरक्षणाचा कायदा लागू झाल्यानंतर यापैकी काही पदे मराठा समाजासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत.

शासनाच्या विविध विभागाअंतर्गत एकूण ३४२ पदांच्या भरतीकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ही जाहिरात प्रसिद्ध केली असून, या रिक्त पदांच्या भरतीकरिता राज्यातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेतील सर्वाधिक म्हणजे २३० पदे ही महसूल विभागातील आहेत. यामध्ये उप जिल्हाधिकारी (गट-अ) साठी ४०, तहसीलदार (गट-अ) ७७, नायब तहसीलदार (गट-ब) ११३ असे एकूण २३० पदांसाठी ही मेगा भरती होणार आहे.

दरम्यान, या पदांसाठी इच्छुकांना ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत http://mahampsc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहेत. इच्छुकांना अर्ज करताना माध्यमिक शालान्त प्रमाणपत्रावर असलेल्या नावाप्रमाणेच नोंदणी करणे व आयोगास अर्ज सादर करणे बंधनकारक आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT