सुधारित वाणांचा अवलंब करा ः डॉ. पाटील
सुधारित वाणांचा अवलंब करा ः डॉ. पाटील 
मुख्य बातम्या

शेतकरी गटांनी बीजोत्पादन कार्यक्रम घ्यावा ः डॉ. पाटील

टीम अॅग्रोवन

अकोला ः अधिक उत्पादनासाठी शेतकरी गटांनी बीजोत्पादन कार्यक्रम घेऊन बियाणे तयार करीत त्याचा प्रसार करावा, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कडधान्य संशोधन विभागाचे सेवानिवृत्त विभागप्रमुख डॉ. ए. एन. पाटील यांनी केले. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व मूर्तिजापूर कृषी विभागाच्या वतीने मौजे कार्ली येथे रब्बी हंगामातील हरभरा पिकाची शेती शाळा आयोजित करण्यात आली. या वेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. तालुका कृषी अधिकारी अमृता काळे, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार, संदीप गवई, कृषी पर्यवेक्षक युवराज अंभोरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या वेळी शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लागवड तंत्रज्ञान, बीजप्रक्रिया, सुधारित वाण, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, आंतरमशागत, पाणी व्यवस्थापन, बीजोत्पादन, प्रक्रिया करून विक्री, उत्पादन वाढ याविषयीची संपूर्ण माहिती देण्यात आली.  डॉ. पाटील यांनी हरभरा पिकांचे काढणी पश्चात तंत्रज्ञान, बीजोत्पादन, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन असलेले हरभरा पिकाचे कांचन, कनक या नवीन वाणाविषयी माहिती दिली. अमृता काळे यांनी कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. श्री. शेगोकार यांनी उन्हाळी भुईमूग, तीळ, मूग पिकाच्या लागवडीविषयी माहिती दिली. त्याचप्रमाणे येत्या खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याची गरज लक्षात घेता घरचे सोयाबीन बियाणे वापरा, तसेच बियाणे उगवण शक्तीची घरगुती चाचणी कशी करावी? याबाबत सविस्तरपणे तांत्रिक मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे संचालन करीत श्री. शेगोकार यांनी आभार मानले. सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक संदीप गवई, कृषिमित्र गोपाल निंघोट यांनी पुढाकार घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT