Action will be taken if the manure is not disposed off
Action will be taken if the manure is not disposed off 
मुख्य बातम्या

शेण खताची विल्हेवाट न लावल्यास होणार कारवाई !

टीम अॅग्रोवन

अमरावती ः गावातील शेणाच्या ढिगामुळे रोगराईचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता राहते. पावसाळ्यापूर्वी असे ढिगारे न उचलणाऱ्या धामणगावरेल्वे तालुक्‍यातील साडेतीन हजार ग्रामस्थांवर प्रशासनाकडून फौजदारी कारवाईच्या हालचालींना वेग आला आहे. गटविकास अधिकारी या संदर्भाने आदेश देण्यात आले आहेत.

धामणगावरेल्वे तालुक्‍यात सर्वाधिक पाळीव जनावरे आहेत. तालुक्‍यातील काही गावांमध्ये ही जनावरे रस्त्यावर बांधली जातात. त्यासोबतच शेणही गावाच्या रस्त्यालगतच टाकले जाते. पावसाळ्यापूर्वी या शेणखताच्या ढिगाची विल्हेवाट न लावल्यास दुर्गंधी सोबतच रोगराईचा प्रादुर्भाव होण्याची भीती राहते. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाकडून शेणाचे ढिगारे उचलण्याचे आदेश दिले जातात.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीस लागू नये याकरिता गावस्तरावरील दक्षता समिती काळजी घेत आहेत. त्यांच्याकडूनच ग्रामस्थांना शेणाची ढिगारे पावसाळ्यापूर्वी उचलण्याचे सांगण्यात आले. परंतू दक्षता समित्यांच्या आवाहनाला गावकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळेच तालुका प्रशासनाने हा प्रकार गांभीर्याने घेत ग्रामसेवकांमार्फत सर्व्हेक्षणाचे आदेश दिले. त्यांच्या सर्व्हेक्षण अहवालात साडेतीन हजार ग्रामस्थांनी घरासमोरील व परिसरातील शेणाचे ढिग उचलले नाही. तसेच खड्डे बुजविले नसल्याचे म्हटले आहे.

याची दखल घेत आगामी सात दिवसांत शेणाचे ढिग किंवा खड्डे बुजविण्यात न आल्यास थेट गटविकास अधिकारी यांच्या आदेशानंतर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत संबंधित ग्रामस्थांवर कारवाई करण्यात येणार आहे.

ग्रामसेवकांच्या प्राथमिक सर्व्हेक्षणात साडेतीन हजारावर ग्रामस्थांनी शेणखताची विल्हेवाट लावली नसल्याची बाब समोर आली आहे. त्यांनी ठरावीक कालावधीत गावातील शेणखताचा प्रश्‍न निकाली न काढल्यास कारवाईचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. - भगवान कांबळे, तहसीलदार, धामणगावरेल्वे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT