निधीचा दुरुपयोग झाल्यास कारवाई :  दादा भुसे
निधीचा दुरुपयोग झाल्यास कारवाई : दादा भुसे 
मुख्य बातम्या

निधीचा दुरुपयोग झाल्यास कारवाई : दादा भुसे

टीम अॅग्रोवन

नाशिक : मालेगाव तालुक्यातील दाभाडी क्लस्टरमध्ये समाविष्ट गावांचा विकास करताना नव्या संकल्पनांचा आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचे आवाहन करतानाच क्लस्टरच्या निधीचा दुरुपयोग झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिला.

नाशिक जिल्हा परिषदेच्या सभागृहात रूरबन मिशनअंतर्गत दाभाडी क्लस्टरमधील विकासकामांची आढावा बैठक झाली. उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरूळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रमोद पवार यांच्यासह अन्य खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

ग्रामसेवकांनी या कामांचा प्राधान्याने पाठपुरावा करून वेळेत काम करण्यासाठी कार्यवाही करावी, असे आवाहन भुसे यांनी केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सर्व यंत्रणांना कालबद्ध पद्धतीने कामांचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. आयआयटी सल्लागार नेमून चांगल्या दर्जाची कामे कशी होतील, याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

प्रस्ताव सादरीकरणाचे आदेश दाभाडी क्लस्टरअंतर्गत गावातील पाणीपुरवठा योजनांचा आराखडा येत्या आठ दिवसांत सादर करण्यात यावा, पर्यावरणपूरक शौचायलयांचे मॉडेल अभ्यासून त्यानुसार शौचालयांचे युनिट उभारण्यात यावे, जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व कामे वेळेत होतील रस्त्यांची सर्व कामे नियोजित वेळेत होतील याची दक्षता घ्यावी, अशी सूचना भुसे यांनी केली. क्लस्टरमधील पथदिवे नसलेल्या गावांचा समावेश रूरबन योजनेंतर्गत करण्यात यावा, कौशल्य विकास प्रशिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन ग्रामपंचायतीचे नवे कार्यालय उभारण्याबाबतचे प्रस्ताव त्वरित सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : विदर्भात पावसाचा अंदाज; पावसासोबतच राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका कायम

Fodder News : विक्रीसाठी चारा उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करा; पशुसंवर्धन आयुक्तांचे आदेश

Agriculture Land : नसलेल्या जमिनीचा शोध!

Crop Management : जमीन, पाऊसमानानुसार करा कोरडवाहू पिकाचं नियोजन

Watermelon Cultivation : प्रयोगशीलता जपत केली खरबूज लागवड

SCROLL FOR NEXT