Action only after inquiry report on 'Jalyukta': Gadakh 
मुख्य बातम्या

‘जलयुक्त’बाबत चौकशी अहवालानंतरच कारवाई : गडाख

नगर : राज्यात भाजप सरकारच्या काळात झालेल्या जलयुक्त शिवार अभियानातून झालेल्या कामांपैकी नगरसह सहा जिल्ह्यांत ७० टक्के कामांत अनियमितता असल्याचा कॅगचा चौकशी अहवाल आहे.

टीम अॅग्रोवन

नगर : राज्यात भाजप सरकारच्या काळात झालेल्या जलयुक्त शिवार अभियानातून झालेल्या कामांपैकी नगरसह सहा जिल्ह्यांत ७० टक्के कामांत अनियमितता असल्याचा कॅगचा चौकशी अहवाल आहे. त्यामुळे त्या कामाची चौकशी करण्यासाठी नियुक्त समितीने कामांची खुली चौकशी सुरू आहे. चौकशी अंतिम टप्प्यात असून, चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.

नगर येथे पत्रकारांशी बोलताना गडाख म्हणाले, ‘‘राज्यात कॅगने सहा जिल्ह्यांतील २ हजार कामांची चौकशी केल्यानंतर असे लक्षात आले की, ७० टक्के कामांत अनियमितता आहे. त्यामुळे सरकारने माजी अप्पर सचिव विजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली असून, त्या समितीने कामाची खुली चौकशी करण्याची गरज असल्याचे सांगितले.

त्यानुसार समितीने बहुतांश कामांची खुली चौकशी होऊन अहवाल सादर करणार आहे. राज्यात जलयुक्तमधील सुमारे ९ लाख कामे झाली असून, ६ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. सहा लाख कामांची चौकशी होणे शक्य नाही. त्यामुळे कामांचे वर्गीकरण करून कामांची चौकशी सुरू आहे. समिती लवकरच अहवाल सादर करेल. त्यानंतर शासन कारवाई करेल.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या भावात चढ-उतार, मक्याच्या भावात बदल, मूग आवकेत चढ-उतार, हळदीचे दर टिकून तर मोसंबीच्या दरात चढ-उतार

Soybean Crop Crisis: पश्चिम विदर्भात सोयाबीन हातातून जाण्याची भीती

Soybean Charcoal Rot: पाण्याच्या ताणामुळं सोयाबीन पिकावर मूळकुजची लक्षणे? वापरा ४ सोपे उपाय

Illegal Mining: सहा कोटी ५ लाख दंडापैकी २ कोटी ९ लाख वसूल

Maharashtra Weather: पुढील ५ दिवस पावसाचे; शनिवार-रविवारी अनेक जिल्ह्यांत जोरदार सरींचा अंदाज

SCROLL FOR NEXT