'सन्मान'चे खाते क्रमांक चुकले 
मुख्य बातम्या

वर्धा जिल्ह्यात २७८४ शेतकऱ्यांचे 'सन्मान'चे खाते क्रमांक चुकले

टीम अॅग्रोवन

वर्धा : शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलेले पैसे अवघ्या काहीवेळातच काढून घेण्याचा संतापजनक प्रकार यवतमाळ येथे समोर आला. त्यानंतर आता जिल्ह्यात २७८४ शेतकऱ्यांचे खाते क्रमांक चुकल्याने ते पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या समोर आले आहे.  

केंद्र सरकारने वर्षाकाठी सहा हजार रुपये मदतीची घोषणा अर्थसंकल्पात केली. त्यानंतर २४ फेब्रुवारी रोजी काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसेही जमा करण्यात आले. शासनाने जिल्ह्यातील पहिली यादी पोर्टलवर अपलोड केली. त्यात १० हजार ३४४ शेतकऱ्यांचा समावेश होता. यादीतील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्याची तपासणी केली. त्या वेळी त्यातील केवळ सात हजार ५६० शेतकऱ्यांचे खातेक्रमांक बरोबर असल्याचे दिसून आले. त्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा झाला. यादीत असलेल्या दोन हजार ७८४ शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्यापासून वंचित राहावे लागले. 

शासनाने ही योजना जाहीर केली. त्या काळात केलेल्या सर्व्हेनुसार जिल्ह्यात एक लाख ३ हजार ९८५ शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याचे समोर आले. यानंतर झालेल्या सर्वेनुसार ७३ हजार ९१४ शेतकऱ्यांची यादी केंद्र सरकारकडे पाठविण्यात आली. त्यातील पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा झाली. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed Bill : बियाणे विधेयकाच्या मसुद्यावर पुन्हा चर्चा; केंद्र सरकारला १८ हजार सूचना

Manoj Jarange Patil: आंदोलन करताना बहिणीने भावाला जेवायला बोलवू नये : मनोज जरांगे पाटील

Baglan Drought : बागलाण तालुक्यात दुष्काळ जाहीर करा; हेक्टरी लाखाची मदत द्या

Drought Management: दुष्काळाबाबत प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी

Sugarcane Crushing Season: गाळपाची घाई, तोट्यात नेई

SCROLL FOR NEXT