Accelerate soybean threshing in Pathrud
Accelerate soybean threshing in Pathrud 
मुख्य बातम्या

पाथरूडमध्ये सोयाबीन मळणीच्या कामांना वेग

टीम अॅग्रोवन

पाथरुड, जि. उस्मानाबाद  : मागील आठ - दहा दिवसांपासून पाथरूडसह परिसरात पावसाने उघडीप दिली आहे. पावसामुळे रखडलेली उडीद पिकाची काढणी अंतीम टप्प्यात आली आहे. सोयाबीन काढणी व मळणीच्या कामाने वेग घेतला आहे.  

गत पंधरा दिवसांपासून पावसामुळे नूकसान झालेल्या सोयाबीन पिकाचे पंचनामे सुरू आहेत. शेतात उभ्या पिकांचे ऑनलाइन तक्रार केलेल्या पिकांचे पंचनामे होत आहेत. पंचनामे झाल्यानंतर सोयाबीन काढणीला वेग आला आहे. परतीच्या पावसामुळे काढणीस आलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी कामात व्यस्त आहेत. मागील आठवड्यात भिजलेल्या उडीद पिकास बाजारपेठेत चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. 

सोयाबीन काढणीसह रब्बी हंगामातील पेरणीसाठी शेतातील गवत काढणे सुरू असल्याने मजुराची कमतरता भासत आहे. अव्वाच्यासव्वा पैसे देऊन शेतातील कामे करावी लागत आहेत. सोयाबीन काढणी व मळणीची कामे जोरात सुरु असताना गेल्या दोन दिवसांपासून आकाशात पुन्हा काळे ढग येऊ लागल्याने शेतकऱ्यात धाकधुक वाढली आहे. काढलेले सोयाबीनची गंजी लावून ताडपत्री व प्लास्टिक कागदाने झाकण्यासाठी शेतकऱ्याची धावपळ होत असल्याचे दिसून येत आहे. 

गतवर्षाप्रमाणे परतीच्या पावसाने काढलेल्या सोयाबीनचे नुकसान होऊ नये म्हणून गंज शेतात लावली आहे. अतिपावसामुळे जमिनीत जास्त ओलावा आहे. त्यामुळे ट्रॅक्टरचे मळणी यंत्र चिखलामुळे शेतात नेहणे आवघड होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत आसल्याने हातातोंडाशी आलेला घास जातो की काय याची भिती वाटू लागली आहे. - सोमनाथ बोराडे, शेतकरी पाथरूड 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate : कांदा पुन्हा गडगडला

Lok Sabha Election 2024 : बारामतीकरांचा कौल मतपेटीत बंद

LokSabha Election : मावळात मशाल पेटणार की धनुष्यबाण चालणार?

Loksabha Election 2024 : अकरा मतदार संघांतील उमेदवारांचे भवितव्य ‘बंद’

PDKV Seed Research Centre : ‘पंदेकृवि’चे बियाणे संशोधन केंद्र ठरले राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट

SCROLL FOR NEXT