80% sowing of cotton in Marathwada
80% sowing of cotton in Marathwada 
मुख्य बातम्या

मराठवाड्यात कपाशीची ८० टक्के पेरणी

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद :  सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत मराठवाड्यात यंदा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कपाशीची ८० टक्के पेरणी झाली आहे. सरासरी १५ लाख ९४ हजार ३०१ हेक्टरच्या तुलनेत १२ लाख ८५ हजार ८०४ हेक्‍टरवर कपाशीची पेरणी झाली आहे.

आठही जिल्ह्यात कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र १५ लाख ९४ हजार ३०१ हेक्टर इतके आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ३ लाख ९४ हजार २६८ हेक्टरसह जालना २ लाख ९० हजार १५१ हेक्टर, बीड ३ लाख ५७ हजार ५५३ हेक्टर, लातूर ३१३३ हेक्टर, उस्मानाबाद १९ हजार २४१ हेक्टर, नांदेड २ लाख ६० हजार ५०५ हेक्टर, परभणी १ लाख ८५ हजार ७२० हेक्टर, तर हिंगोली जिल्ह्यातील ८३ हजार ७३० हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. 

कृषीच्या लातूर व औरंगाबाद या दोन विभागांपैकी औरंगाबाद विभागातील ३ जिल्ह्यात सरासरी १० लाख ४१ हजार ९७२ हेक्टर कपाशी क्षेत्राच्या तुलनेत ९ लाख १५ हजार ४२३ हेक्टरवर अर्थात ८८ टक्के क्षेत्रावर लागवड उरकली. दुसरीकडे लातूर कृषी विभागांतर्गत सरासरी ५ लाख ५२ हजार ३२९ हेक्टरपैकी ३ लाख ७० हजार ३८१ हेक्टरवर अर्थात ६७ टक्के क्षेत्रावर लागवड झाली. २४ जून अखेरपर्यंत मराठवाड्यात ११ लाख ४९ हजार ५८७ कपाशीची लागवड झाली होती.

३६ लाख ८४ हजार हेक्टरवर पेरणी

यंदा मराठवाड्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र ५० लाख १२ हजार ६४२ हेक्टर इतके आहे. २ जुलै अखेरपर्यंत त्यापैकी ३६ लाख ८४ हजार ५४८ हेक्टरवर खरिपाची पेरणी उरकली. यामध्ये औरंगाबाद कृषी विभागांतर्गत तीन जिल्ह्यात १७ लाख ४४ हजार ८६० हेक्टरवर, तर लातूर कृषी विभागांतर्गत पाच जिल्ह्यात १९ लाख ३९ हजार ६८१ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली. औरंगाबाद जिल्ह्यात ८७ टक्के सर्वाधिक, तर सर्वांत कमी उस्मानाबाद जिल्ह्यात ५५ टक्के झाली पेरणी झाली.

जिल्हानिहाय कपाशी लागवडीचे क्षेत्र (२ जुलैअखेर (हेक्टर)

औरंगाबाद  ३५५४१२ 
जालना  २७७०८५ 
बीड २८२९२६ 
लातूर  ६६६८
उस्मानाबाद  ५३५२
नांदेड १८०३५७
परभणी  १४०४०७
हिंगोली ३१५९७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT