77,000 farmers registered for e-crop survey in Parbhani district
77,000 farmers registered for e-crop survey in Parbhani district 
मुख्य बातम्या

परभणी : ‘ई-पीक पाहणी’वर ७७ हजार शेतकऱ्यांकडून नोंदणी

टीम अॅग्रोवन

परभणी ः ‘‘ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे यंदाच्या खरीप हंगामातील पीकपेरा नोंदणीसाठी गुरुवार (ता. ३०) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. सोमवार (ता. २०)पर्यंत जिल्ह्यातील ३ लाख ४७ हजार ९१८ शेतकरी खातेदारांपैकी ७६ हजार ९५७ शेतकऱ्यांनी या अॅपवर नोंदणी केली आहे. उर्वरित २ लाख ७० हजार ९६१ शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी बुधवार (ता. २२) ते शुक्रवार (ता.२४) या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे,’’ अशी माहिती जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिली.

‘‘ई-पीक पाहणी नोंदणीचा पथदर्शक प्रकल्प गतवर्षी (२०२०) सेलू तालुक्यात राबविण्यात आला होता. त्याचा फायदा झाला. त्यामुळेच यंदा (२०२१) सेलू तालुका ई-पीक अॅपवर नोंदणीच्या कामात आघाडीवर आहे. सोमवार (ता. २०)पर्यंत सेलू तालुक्यातील ९४ गावांतील ५९ हजार १९ शेतकरी खातेदारांपैकी २८ हजार ७०५ शेतकऱ्यांनी (७४.२४ टक्के) नोंदणी केली.

सोनपेठ तालुक्यात केवळ ७.०७ टक्के शेतकऱ्यांनी नोंदणी केली. ई-पीकपेरा नोंदणीच्या कामात गती आणण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्यातील संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांवर उर्वरित शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्याची जबाबदारी याद्वारे सोपविण्यात आली आहे. तालुकास्तरावर सुक्ष्म नियोजन करून ही मोहीम यशस्वी करावी’’, अशा सूचना गोयल यांनी दिल्या.

तलाठी, कृषी सहायक, पोलिस पाटील, रोजगार सेवक, रेशन दुकानदार, शेतीमित्र, कोतवाल, प्रगतिशील शेतकरी, आपले सरकार सेवा केंद्रचालक, सीएससी केंद्रचालक, संग्राम केंद्रचालक, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी, तरुण मंडळाचे पदाधिकारी आदींची निवड करावी. त्यांच्या साह्याने गावातील शेतकऱ्यांना पीकपेरा नोंदीबाबत मार्गदर्शन करावयाचे आहे.

मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक मंडळनिहाय, सज्जानिहाय नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, कृषी मंडळ अधिकारी आणि कृषी पर्यवेक्षकांना पर्यवेक्षकीय अधिकारी म्हणून नेमले आहे. शेतकऱ्यांनी या मोहिमेत भाग घ्यावा, असे गोयल म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

Indian Monsoon : पाऊसकाळ उत्तम, पुढे काय?

Bachchu Kadu : देशात धर्म नाहीतर शेतकरी संकटात, बच्चू कडूंचा विरोधकांवर 'प्रहार'

Water Scarcity : आडातच नाही, तर...

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

SCROLL FOR NEXT