जळगाव जिल्ह्यात ६५ टक्‍के खतपुरवठा
जळगाव जिल्ह्यात ६५ टक्‍के खतपुरवठा 
मुख्य बातम्या

जळगाव जिल्ह्यात ६५ टक्‍के खतपुरवठा

टीम अॅग्रोवन

जळगाव :  जिल्ह्यात खरीप हंगामासाठी लागणारा रासायनिक खतांचा ६५ टक्‍के पुरवठा झाला आहे. पावसाने साधारण महिनाभर दडी मारल्याने पेरण्या लांबल्या होत्या. यातच आठ दिवसांपासून पावसाने पुन्हा हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांकडून खतांची खरेदी जास्त प्रमाणात झालेली नाही. परंतु युरियाचा पुरवठा अतिशय कमी असून, पुरवठ्याची टक्केवारी फक्त ४० टक्केच राहिल्याची माहिती आहे.

केळीची शेती व पूर्वहंगामी कापसाला खतांची गरज असल्याने जिल्ह्यात तापीकाठावर खतांचा वापर अधिक आहे.  त्यात सरळ खतांची उपलब्धता कमी आहे. डीएपी मुबलक असून, युरिया पुरेशा प्रमाणात नाही. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना नाडण्याचे प्रकार सुरू असून, जादा दरात खतांची विक्री केली जाते, अशा तक्रारी आहेत. शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील ८० टक्‍के पेरण्यांचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. अनेक ठिकाणी उन्हाळी कपाशी लागवडही झाली आहे. पिकांसाठी आवश्‍यक रासायनिक खतांचा पुरवठा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून मागविला जातो. त्यानुसार यंदासाठी आवश्‍यक खतांची मागणी करण्यात आली असून, खतांची एकूण उपलब्धता १ लाख २१ हजार १४३ टन आहे. 

१९ हजार ४३२ मेट्रिक टन खतसाठा शिल्लक एकूण खतांपैकी १ लाख १ हजार ७११ मेट्रिक टन खतांची विक्री झाली असून, आजअखेरपर्यंत जिल्ह्यात १९ हजार ४३२ मेट्रिक टन इतका खतांचा साठा शिल्लक आहे. यात युरिया ३ हजार ५४, एनपीके १३ हजार ६०९, म्युरिट ऑफ पोटॅश २ हजार २८०, १०-२६-२६ पाच हजार ११३ मेट्रिक टन इतका साठा शिल्लक आहे. खतांचा तुटवडा जाणवण्याची शक्‍यता नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

खतांच्या प्रकारानुसार उपलब्धता (आकडे टनांत)

युरिया   ३३,६४५
एस.एस.पी २३,७६०
म्युरिट ऑफ पोटॅश  २३,३२८
डाय.अमो. फॉस्फेट   ३,१८७
अमोनियमन सल्फेट ३५५
२०-२०-२० ३,४३३
१९-१९-१९ १,६१५
२४-२४-० २,९१४
१५-१५-१५   २,९१४
१२-३२-१६   ५,९९१
१०-२६-२६   १५,५७३
१६-१६-१६  ६,१९३
१८-१८-१०  १,२०५
एन.पी.के  ३७,२२३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT