cotton
cotton 
मुख्य बातम्या

कापसाचे ६१४ कोटी थकीत

टीम अॅग्रोवन

नागपूर : राज्यात खरेदी करण्यात आलेल्या कापसाची एकूण किंमत ४९३६ कोटी रुपये आहे. त्यापैकी ४३२१ कोटी रुपयांचे चुकारे करण्यात आले तर ६१४ कोटींचे चुकारे शिल्लक आहेत. तसेच विदर्भ, परभणी आणि जळगाव या तीन विभागात शिल्लक कापसाची खरेदी या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी दिली.

बाजारात कापसाचे दर पाच हजार ५५० रुपये या हमीभावापेक्षा कमी होते. परिणामी शेतकऱ्यांनी ‘सीसीआय’ तसेच कापूस पणन महासंघाला आपला कापूस विकला. त्यामुळे राज्यात यावर्षी विक्रमी ९२ लाख २७ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. ‘‘राज्यात खरेदी करण्यात आलेल्या कापसाची एकूण किंमत ४९३६ कोटी रुपये आहे. त्यापैकी ४३२१ कोटी रुपयांचे चुकारे करण्यात आले आहेत. सद्यःस्थितीत ६१४ कोटी रुपयांचे चुकारे शिल्लक असून त्याकरिता लवकरच निधीची तरतूद केली जाणार आहे. साधारणतः या आठवड्याच्या अखेरीस सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात कापूस खरेदीची रक्कम जमा होईल,’’ अशी माहितीही श्री. देशमुख यांनी दिली.  

प्रतिक्रिया राज्यात यावर्षी ९२ लाख २७ हजार क्विंटल इतक्या विक्रमी कापसाची खरेदी करण्यात आली आहे. मनुष्यबळ कमी असतानाही पणन महासंघाच्या कर्मचाऱ्यांनी शेतकरी हिताला प्राधान्य देत ही खरेदी केली. सद्यःस्थितीत ६१४ कोटी रुपयांचे चुकारे थकीत असून या आठवड्यात त्याकरता तरतूद करून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल. — अनंतराव देशमुख, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT