fertilizers
fertilizers 
मुख्य बातम्या

शेती संबंधीत उत्पादनाकरिता ४९ परवानगी पत्राचे वाटप 

टीम अॅग्रोवन

पुणे: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामधील एमएआयडीसी उति संवर्धित रोपे तयार करणारे खाजगी युनिट, बियाणे खते व किटकनाशके उत्पादन करणारे खाजगी उद्योजक, ठिंबक सिंचन संच तयार करणाऱ्या कंपन्यांनी उत्पादन सुरू करण्यासाठी परवानगी मागितली आहे. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे केलेल्या मागणीप्रमाणे पुणे जिल्ह्यातील ४९ कंपनीना उत्पादन व विक्री परवानगी पत्र तसेच वाहतुकीसाठी ७६ पास देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल यांनी दिली.  जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश निर्गमित केले आहेत. तथापी बियाणे यामध्ये अन्नधान्य, फळे, भाजीपाला बियाणे व उतिसंवर्धित रोपे, कलमे इ. सर्व जे पेरणी, लागवडीसाठी वापरतात यांचा समावेश होतो. खते यामध्ये संद्रीय, असेंद्रीय व मिश्र खतांचा समावेश होतो. अत्यावश्यक वस्तु कायदा १९५५ मध्ये समाविष्ट असल्याने पीक उत्पादन वाढीसाठी किटकनाशकांच्या आवश्यकतेमुळे शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात बियाणे, खते व किटकनाशकांचा सुरळीत पुरवठा होण्याच्या दृष्टीने त्यांचे उत्पादन, वाहतुक व विक्री ही अत्यावश्यक सेवेत असून त्यांना संचारबंदीतून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या आदेशान्वये मुभा देण्यात आली आहे.  सध्या सर्व अधिनस्त कार्यालयांमार्फत जिल्ह्यातील बियाणांचे दोन हजार १३६, खतांचे दोन हजार ४०२ व किटकनाशकांचे दोन हजार १९८ असे एकूण सहा हजार ७३६ अधिकृत परवाना धारक विक्रेत्यांना कळविण्यात आले असून सर्व विक्री केंद्रे त्याचे स्थानिक प्रशासनाकडील नियमांनुसार सुरळीत चालू करण्यात आले आहेत. तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जिल्ह्यामधील स्कायमेट वेदर सर्व्हिसेस यांनी त्यांनी या कार्यालयाकडे केलेल्या मागणीप्रमाणे व हवामान डेटाबेस अखंडीत चालु राहणे आवश्यक असल्याने परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय त्यांना कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंध, नियंत्रणासाठी केंद्र व राज्य सरकार मार्फत वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे व सोशल डिस्टसिंगचे काटेकोरपणे पालन करणेच्या सुचना दिल्या आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू यांचे काय आहेत दर ?

Agriculture Update : विकसित केलेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे : कलंत्रे

SCROLL FOR NEXT