दूध
दूध  
मुख्य बातम्या

दुधातील ४३ प्रतिजैविकांच्या रेसिड्यूची तपासणी होणार

टीम अॅग्रोवन

पुणे : दुधात आढळणाऱ्या ४३ प्रतिजैविकांच्या रेसिड्यूची तपासणी पहिल्या टप्प्यात करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. आजारी जनावरांवर प्रतिजैविकांचा (अन्टिबायोटिक्स) अंदाधुद वापर; तसेच आजारी जनावरांचे दूध विकणे अशा दोन्ही प्रकारांबाबत आता काळजी घ्यावी लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.  “केंद्र शासनाच्या कक्षेतील अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसआयई) दुधातील ४३ प्रतिजैविकांच्या उर्वरित अंशाची (रेसिड्यू) पातळी जाहीर केली आहे. यापूर्वीच्या जुन्या यादीत प्रतिजैविकांची संख्या ९३ होती. याचाच अर्थ एक एप्रिलपासून तपासणी करताना आधीच्या यादीतील ५० मूलद्रव्ये तूर्त बाजूला ठेवण्यात आली आहेत”, असे डेअरी उद्योगातील एका अभ्यासकाने स्पष्ट केले. दुधातील प्रतिजैविकांच्या रेसिड्यू पातळी प्राधिकरण फारसे लक्ष देत नव्हते. जनावरांसाठी प्रतिजैविकांचा वापर करताना निकष पाळले जात नाहीत. जादा वापरामुळे प्रतिजैविकांचे अंश थेट दुधात उतरतात. असे दूध सेवन केल्याने थेट मानवी शरीरात प्रतिजैविके प्रवेश करतात, असा निष्कर्ष काढला गेला. त्यामुळे प्राधिकरणाने हा मुद्दा आता अतिशय गांभीर्याने घेतला आहे.  “राज्यातील खासगी व सहकारी दूध संघांकडून प्रतिजैविकांच्या वापराबाबत आपआपल्या पातळीवर शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्याचे काम सुरू आहे. मात्र, हा मुद्दा डेअरीच्या पातळीवर नव्हे; तर थेट दूध उत्पादकाच्याच पातळीवर हाताळावा लागेल. ‘एफएसएसआयई’ने प्रतिजैविके व जनावरांच्या औषधांच्या उर्वरित अंशाबाबत अजून अंतिम यादी जाहीर केलेली नाही. यादी तयार करण्याचे काम अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे दूध उद्योगाला या मुद्द्याकडे आता दुर्लक्ष करता येणार नाही,” असे मत सहकारी संघातील एका विश्लेषकाने व्यक्त केले.  दरम्यान, देशात प्रतिजैविकांच्या रेसिड्यूबाबत तपासणी करणारी यंत्रणाच विविध राज्यांकडे नसल्याचे सांगितले जाते. “महाराष्ट्रातदेखील क्षेत्रीय पातळीवर प्रतिजैविकांची तपासणी करणारी साधने उपलब्ध नाहीत. प्रत्येक गावात तशी साधने दिली तरच मर्यादा पातळी ओलांडणारे दूध कोणी आणले याचा तपास करता येईल,” असेही सूत्रांनी स्पष्ट केले.  प्रतिजैविक अंशाचा मुद्दा नाजूक ः चितळे दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे प्रतिनिधी व चितळे डेअरीचे संचालक श्रीपाद चितळे म्हणाले की, प्रतिजैविकांचा वापर डेअरीचालक करीत नाहीत. त्याचा मूळ वापर जनावरांचे डॉक्टर किंवा पशुचिकित्सा कर्मचारी वर्गाकडून होतो. त्यांचे सर्वप्रथम प्रबोधन करावे लागेल. तसेच, प्रतिजैविकांचा वापर झाला असल्यास अशा जनावरांचे दूध आणू नये यासाठी उत्पादकांचे प्रबोधन करावे लागेल. विदेशात उत्पादनाच्या ठिकाणीच ‘बल्क मिल्क कुलर्स’मध्ये दूध गोळा होते व तेथेच प्रतिजैविकांचे अंश तपासणी होते. भारतात मात्र छोटे शेतकरी २-५ लिटर दूध थेट विक्री करतात. त्यामुळे हा मुद्दा शासनाला नाजुकपणे हाताळावा लागेल.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT