38.91 lakhs in Parbhani Fund work in progress
38.91 lakhs in Parbhani Fund work in progress 
मुख्य बातम्या

परभणीत ३८.९१ लाखांच्या निधीची कामे प्रगतिपथावर

टीम अॅग्रोवन

परभणी ः जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियाना अंतर्गत ३१ लाभार्थी शेतकऱ्यांना २२ लाख २० हजार रुपये अनुदान वाटप करण्यात आले. ६२ शेतकऱ्यांची ३८ लाख ९१ हजार ७८२ रुपयांच्या निधीची कामे सुरु आहेत. तर, ३३ शेतकऱ्यांची १ कोटी ४७ लाख ९२ हजार रुपये किमतीची कामे अजून प्रलंबित आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियाना अंतर्गत ट्रॅक्टर, मल्चिंग, शेततळे, शेडनेटगृह, पॉलिहाऊस आदी घटकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील ७६७ शेतकऱ्यांच्या प्रस्तावित १० कोटी ७ लाख ३२ हजार ११३ रुपयाच्या कामांची निवड करण्यात आली होती. या अंतर्गत ट्रॅक्टर खरेदी केलेल्या ३१ शेतकऱ्यांना २२ लाख २० हजार ६७ रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. त्यात परभणी, सोनपेठ, पालम, पूर्णा या तालुक्यातील प्रत्येकी २ शेतकऱ्यांना प्रत्येकी २ लाख रुपये अनुदान वाटप करण्यात आले.

जिंतूर तालुक्यातील ७ शेतकऱ्यांना ४ लाख ७१ हजार ४१० रुपये, सेलू तालुक्यातील १ शेतकऱ्यास १० हजार ९७७ रुपये, मानवत तालुक्यातील १३ शेतकऱ्यांना ९ लाख ८८ हजार ८८० रुपये, पाथरी तालुक्यातील १ शेतकऱ्यास १ लाख रुपये अनुदान वाटप करण्यात आले. एकूण ६२३  शेतकऱ्यांचे अर्ज रद्द झाले.

कांदा चाळींची ४२२ कामे सुरु 

‘राष्ट्रीय कृषी विकास योजने’अंतर्गंत २०१८-१९ मध्ये कांदा चाळींसाठी १ हजार ३११ शेतकऱ्यांची निवड झाली होती. त्यापैकी कामे पूर्ण केलेल्या सेलू आणि पाथरी तालुक्यातील २ शेतकऱ्यांना १ लाख ५५ हजार ८५८ रुपये अनुदान वाटप करण्यात आले. कांदा चाळींची ४२२ कामे सुरु आहेत. अजून ३५२ कामे प्रलंबित आहेत. तर, ५२५ शेतकऱ्यांचे अर्ज रद्द झाले आहेत.

शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठी ३६८ अर्ज आले आहेत. त्यापैकी ३५ कामे सुरु आहेत. ७ कामे प्रलंबित आहेत. तर ३१८ अर्ज रद्द झाले आहेत. २०१९-२० मध्ये संरक्षित शेतीसाठी ९५ अर्ज आले. त्यापैकी ३ कामे सुरु आहेत. २१ कामे प्रलंबित आहेत. ६९ अर्ज रद्द झाले. भाजीपाला रोपवाटिकेसाठी १३४ अर्ज आले. त्यापैकी १७ कामे सुरु आहेत. २८ कामे प्रलंबित आहेत. ८६ अर्ज रद्द झाले आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भात गारपिटीचा इशारा

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

SCROLL FOR NEXT