3475 farms pond completed in Parbhani district
3475 farms pond completed in Parbhani district 
मुख्य बातम्या

परभणी जिल्ह्यात ३४७५ शेततळी पूर्ण

टीम अॅग्रोवन

परभणी : ‘‘जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत सोमवार (ता. १६)पर्यंत ३ हजार ४७५ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. काम पूर्ण केलेल्या ३ हजार १५२ शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम अदा करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत १४ कोटी ९० लाख ३२ हजार रुपये एवढा निधी खर्च झाला,’’ अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

या योजनेअंतर्गत जिल्ह्यात ३ हजार शेततळ्यांच्या कामांचा लक्ष्यांक होता. परंतु, गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात अनियमित, अपुऱ्या पावसामुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी राहत आहे. सततच्या दुष्काळी स्थितीमुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. शेततळ्यांच्या माध्यमातून पावसाचे पाणी जमिनीत मुरविल्यामुळे फायदा होत असल्याचा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत योजनेस शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 

यंदा या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १२ हजार १४० शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत कृषी विभागाकडे अर्ज केले. एकूण अर्जांपैकी ९ हजार ३०८ शेतकऱ्यांचे अर्ज तांत्रिकदृष्ट्या योग्य ठरले. त्यापैकी ९ हजार २७५ शेतकऱ्यांना शेततळ्यांची मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ९ हजार ११९ शेततळ्यांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले.

आजवर ७ हजार ४०३ शेततळ्यांची आखणी करून देण्यात आली. त्यापैकी ३ हजार ४७५ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यापैकी ३ हजार १५२ शेतकऱ्यांचे अनुदान अदा करण्यात आले. त्यासाठी १४ कोटी ९० लाख ३२ हजार रुपये एवढा निधी खर्च झाला.

तालुकानिहाय शेततळे स्थिती 

तालुका  पूर्ण शेततळी अनुदानप्राप्त शेततळी खर्च (लाखांत)
परभणी ७९४ ७३३ ३५४.५३
जिंतूर ९४० ८२८ ३८३.८६
सेलू   ३९३   ३६० १६४.२९
मानवत  ६४७ ५६८ २७६.८३
पाथरी १६१ १५३ ७०.१५
सोनपेठ १७३ १५९ ७६.८३
गंगाखेड १७९ १७३ ७३.५९३
पालम ८८ ८०  ३६.६६६
पूर्णा   १०० ९८ ४५.५४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT